नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राजस्थानच्या जालोर येथे निवडणूक प्रचार सभेत विश्वकप क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाच्या पराभवाविषयी भाष्य करताना “अच्छा भला हमारे लडके वर्ल्ड कप जीत जाते, लेकिन पनौतीने हरवा दिया.” असे प्रतिपादन केले. राहुल गांधी यांच्या या विधानावरून राजकारण तापले आहे.

हेही वाचा – उच्च न्यायालय डिजिटल होणार, ‘पेपरलेस’कडे वाटचाल…

हेही वाचा – वाशिममध्ये २ लाख ५ हजार ६४२ कुणबी नोंदी आढळल्या; संख्या वाढण्याची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल असे वक्तव्य केल्याबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपाने केली. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना भाजपालाच प्रश्न केला. ते म्हणाले राहुल गांधी भाषण देत असताना काही युवक पनवती, पनवती असे ओरडत होते. क्रिकेट विश्वकप अंतिम सामना झाल्यानंतर पनवती हा शब्द समाजमाध्यमावर प्रचिलत झाला आहे. त्यामुळे पनवतीमुळे भारतीय संघ हरला असे राहुल गांधी म्हणाले. कोणाच्या नावाचा उल्लेख केला नसताना पनवती शब्दामुळे मोदींचा अपमान झाला, असे भाजपाचे म्हणणे असेल तर त्यावर त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे.

Story img Loader