Maharashtra Assembly Election 2024 NCP Anil Deshmukh Attackनागपूर :  राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार ) ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला. अनिल देशमुख नरखेड येथील सांगता सभा आटपून काटोल येथे तीनखेडा भिष्णुर मार्गाने परत येत असताना रात्री ८ च्या सुमारास त्यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात अली. या घडनेनंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सत्ताधारी पक्ष विशेषतः भाजपने घटनेबाबत संशय व्यक्त केला आहे.

काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ काही व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करत जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या अनिल देशमुख यांच्यावर उपचार सुरू आहे. तर घडलेल्या प्रकरणावरुन संताप व्यक्त केला जात आहे. सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांनी  प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे विधान परिषद सदस्य परिणय फुके यांनी अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला संशयास्पद असून त्यांनी स्वतःच स्वतावर हल्ला घडवून आणला असण्याची शक्यता आहे, असे सांगितले.

operation lotus
‘ऑपरेशन लोटस’वरून आरोप-प्रत्यारोप; चंद्रशेखर बावनकुळेंच्या दाव्याचे नाना पटोलेंकडून खंडन
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : ‘मविआ’ला धक्का बसणार? “अनेकजण शिवसेना, भाजपाच्या संपर्कात”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
Aba Bagul, Parvati Assembly Constituency,
‘बंडखोर’ आबांचे घरवापसीसाठी ‘आर्जव’
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
sarva jat dharm ekta manch
बांगलादेशातील हिंदू विरुद्ध अत्याचार मोदी सरकारने रोखावेत, सर्व जाती-धर्म एकता मंचची मागणी

हेही वाचा >>>सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादातूनच देशमुखांवर हल्ला, पुत्र सलील यांचा गंभीर आरोप

भाजपचे काटोल विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी अविनाश ठाकरे यांनी यात भाजप कार्यकर्त्यांचा काही संबंध नाही. आमचे कार्यकर्ते बुथ कामात व्यस्त आहेत. अनिल देशमुख यांनी सहानभूती मिळावी म्हणून स्वतःच हल्ला घडवून आणला असावा. त्यासाठी आता ते पट्टी लावून फिरत आहेत. ही देशमुखांची स्टंटबाजी आहे, असा आरोप केला.

दरम्यान विरोधी पक्षातील नेत्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे.  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला होणे निंदनीय आहे. भाजपला स्टंटबाजी वाटत असेल तर चौकशी करून सत्य समोर आणावे, असे आव्हान काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी भाजपला दिले. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रक्तबंबाळ अवस्थेत कारमध्ये बसलेल्या अनिल देशमुखांचा व्हिडीओ आपल्या एक्स अकाऊंटवरून पोस्ट करत थेट फडणवीसांना सवाल केला आहे.

“गृहमंत्री फडणवीस यांच्या नागपुरात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्याड खूनी हल्ला झाला. फडणवीस आपली यावर काय प्रतिक्रिया आहे? हा राजकीय हल्ला आहे. मुंबईत माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या होते आणि नागपुरात माजी गृहमंत्र्याला ठार मारण्याचा प्रयत्न होतो. शेम! शेम!” असं राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही सोशल मीडियावरून या घटनेचा निषेध केला आहे. “राज्याचे माजी गृहमंत्री व आमचे नेते अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध! राज्यात कायदा व सुव्यवस्था केवळ कागदावर राहिली आहे. ऐन निवडणुकीत ज्येष्ठ नेत्यांच्या गाडीवर असे जीवघेणे हल्ले होत असतील तर राज्य खरंच जंगलराजकडे वळला आहे, हे आता सिद्ध झालं आहे. महाराष्ट्राने अशी विकृती कधीच पाहिली नव्हती. विशेषत: नागपुरात कायदा व सुव्यवस्था राखण्यात भाजप सपशेल झाली असून गुन्हेगारांना इथे बळ मिळाले आहे. या हल्ल्याची सखोल चौकशी होऊन आरोपींना लवकरात लवकर गजाआड करावे अशी आमची मागणी आहे,” असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा >>>दिग्गज नेत्यांनी चंद्रपूरचे प्रचार मैदान गाजवले; ‘डॉली चायवाला’चा रोड शो

कोणत्याही दबावाला बळी न पडता पोलिसांनी…

रोहित पवार यांनीही या घडलेल्या घटनेवर प्रतिक्रिया नोंदवली आहे. “ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध. यातून देशमुख साहेब हे लवकर बरे होतील, असा विश्वास आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता पोलीस हल्लेखोर आणि त्यामागील मास्टरमाईंड यांच्या मुसक्या आवळतील, ही अपेक्षा,” असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

सुप्रिया सुळे म्हणतात, “भाजपाच्या काळात…”

तर सुप्रिया सुळे यांनी, “निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने हल्ला करणारी मानसिकता या राज्यात कधीही नव्हती. हे राज्य लोकशाही विचारांना मानणारे राज्य आहे. पण भाजपाच्या काळात राज्यातील विशेषतः नागपूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा झाली असून गुंडांना मोकळे रान मिळाले आहे. या घटनेची सखोल चौकशी होऊन देशमुखांवर हल्ला करणारे हल्लेखोर आणि त्यांचे मास्टरमाईंड गजाआड झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे,” असं म्हटलं आहे.

Story img Loader