नागपूर : हिंदू धर्मामध्ये विवाह करताना गेल्या काही वर्षात मुलाचा किंवा मुलींचा विवाह करताना पालकांकडून मुलांची आणि मुलीची पत्रिका (कुंडली) जुळते आहे की नाही हे बघितले जाते. यामध्ये दोन्ही पक्षातील म्हणजेच वर आणि वधूचे किती गुण जुळतात हे पाहिजे जाते आणि याच आधारावर लग्न करणे शक्य आहे की नाही हे ठरवले जाते. यातही अनेक लोकांचा या जन्मकुंडलीवर विश्वास नसतो त्यामुळे ते पत्रिका पाहण्याच्या भानगडीत पडत नाही.मात्र अनेकदा पत्रिका जुळत नसल्याने लग्न जुळत नाही वगैरे असे आपण ऐकत असताना हे पत्रिका जुळणे म्हणजे नेमके काय याबाबत अनेकांना माहिती नाही.

यासंदर्भात राजंदेकर पंचांगच्या ज्योतिषाचार्य प्रीती राजंदेकर यांनी सांगितले, लग्नापूर्वी संभाव्य वधू आणि वरची कुंडली जुळवणे ही एक विवाहापूर्वीची महत्त्वपूर्ण पायरी मानली जाते. विशेषत: भारतात, जिथे विवाह आयुष्यभर टिकणे अपेक्षित आहे. कुंडली, एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल केवळ अंदाज नसतात, तर प्रत्येक व्यक्तीच्या नैसर्गिक व्यक्तिमत्त्वाच्या वैशिष्ट्यांबद्दल देखील बोलतात. लग्न करण्याचा आधी सर्वा्त महत्त्वाचा निर्णय घेताना मुलगा आणि मुलीची कुंडल्या जुळतात याकडे अधिक लक्ष दिले जाते. वधू आणि वर यांच्या कुंडलीचे जुळते आहे आहे तर दोघांचे स्वभाव एकमेकांशी सुसंगत आहेत की नाही यावर प्रकाश टाकू शकतात. इतकेच नाही तर कुंडली ग्रहांची स्थिती वाचून, भविष्यात नातेसंबंधात अडचणी येतील की नाही हे देखील बघू शकतो.

Pimpri, vote oath, marriage ceremony, marriage,
पिंपरी : आधी मतदानाची शपथ… नंतर विवाह सोहळा…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Nagpur Bench of Bombay High Court held Even with consent of minor wife physical intercourse is part of rape
अल्पवयीन पत्नीसोबत सहमतीतून शारीरिक संबंध बलात्कारच, उच्च न्यायालय म्हणाले, ‘पीडितेच्या इच्छेविरोधात…’
nikhil rajeshirke wedding ritual begins
‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्याची लगीनघाई! होणाऱ्या पत्नीसह केलं प्री-वेडिंग शूट, हळदीला सुरुवात; फोटो आले समोर
japan ban wedding after 25 for women
‘या’ देशात महिलांना पंचविशीनंतर विवाहास मनाई, प्रस्तावावरून नागरिक संतप्त; कारण काय?
some shubh muhurat for wedding in November and December this year
दिवाळीनंतर लग्नांसाठी हे आहेत शुभ मुहूर्त…
Vivah muhurat 2025 Marriage Dates in 2025 Hindu Panchang
Vivah Muhurat 2025 : नवीन वर्ष २०२५ मध्ये विवाहासाठी किती शुभ मुहूर्त, पाहा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या तारखांची यादी

हेही वाचा >>>“मी प्रतिज्ञापत्र देतो की…’; वर्धा जिल्ह्यात शरद पवारांना शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे समर्थन

नातेसंबंध समीकरणामध्ये कुंडली जुळवताना विचारात घेतलेले प्रमुख मापदंडम्हणजे गुण. एकंदरीत, वर वधूमधील सुसंगतता तपासण्यासाठी आठ पैलूंचा विचार करतो. याला गुणमिलन म्हणतात. एकूण ३६ गुण असतात. जर दोन कुंडलींमध्ये १८ किंवा त्याहून अधिक गुण एकमेकांशी जुळत असतील तर विवाह मान्य आहे. सुसंगतता तपासण्यासाठी आठ पैलू कुठले तर त्यात वर्ण , वश्य , तारा, योनी- ग्रह, मैत्री,गण, भकूट आणि नाडी असे असून त्यात ३६ गुण असतात. याशिवाय जन्म कुंडली आणि नवमांश कुंडली देखील बघितली जाते. सुसंगतता सुद्धा महत्त्वाची असून त्यात तुमच्या संभाव्य मानसिक आणि शारीरिक अनुकूलतेबद्दल जाणून घेतले पाहिजे. कुंडली जुळवणे महत्वाचे आहे. कारण ते दोन्ही भावी जीवन-भागीदारांच्या चारित्र्य वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकते, जेणेकरून तुम्ही दीर्घकाळात एकमेकांशी जुळवून घेऊ शकता की नाही याचा न्याय करू शकता. शिवाय आर्थिक विचार बघता कुंडली जुळण्यामुळे तुमच्या आर्थिक संभावनांचे भाकीत होऊ शकते. तुमच्या भावी वधू किंवा वराची आर्थिक स्थिती लग्नापूर्वी जाणून घेणे आवश्यक आहे. जरी सध्या तुमच्या भावी जोडीदाराची आर्थिक स्थिती कमकुवत असली तरी भविष्यात त्याच्या/तिच्या करिअर किंवा व्यवसायात प्रगतीची शक्यता अत्यंत उज्ज्वल असेल असेही रांजदेकर म्हणाल्या.