नागपूर : तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले असले तरीही परंपरा, संस्कृती आणि काही गोष्टींचे धार्मिक महत्त्व कमी होत नसल्याचे दिवाळीसारख्या सण-उत्सवात दिसून येते. लक्ष्मी पूजनाला आवर्जून स्थान असणाऱ्या केरसुणीची पूजा का केली जाते, याबाबत ज्योतिषाचार्य प्रीती राजंदेकर यांनी सांगितले आहे की, दिवाळी खरेदीत आकाश कंदील, पणत्या, फटाके आणि कपड्यांसोबत नव्या केरसुणीची खरेदी केली जाते. धनत्रयोदशीला खरेदी करून लक्ष्मी पूजनाला तिची पूजा करण्याची परंपरा असल्याने आजही केरसुणी बाजारात आपले अस्तित्व टिकवून आहे. शहरात महाल, इतवारी, गोकुळपेठ, सक्करदरा आदी बाजारांसह अनेक ठिकाणी केरसुणीची विक्री करणारे लोक दिसून येत आहेत. दिवाळीच्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजनाला केरसुणीची पूजा करण्याची प्रथा आहे. केरसुणीला लक्ष्मी असे म्हणतात. त्यामुळे तिची पूजा केली जाते. ग्रामीण भागात आजही ही प्रथा पाळली जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा