नागपूर : जी २० चे अध्यक्ष पद भूषविणारे पीएम मोदी ८ भारतीय निवृत्त सैनिकांच्या फाशी बद्दल चूप का? असा प्रश्न करीत सैनिकांची सुटका करण्याच्या मागणीसाठी आम आदमी पार्टीने व्हेरायटी चौकात निदर्शने केली. अनेक वर्षे भारतीय नवदलात सेवा देऊन ज्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून आपलं सर्वस्व देशाच्या रक्षणसाठी खर्ची घातले असे आमचे आठ भारतीय सेवानिवृत्त नवदलसैनिक मृत्यूच्या दारात उभे आहेत. त्यांना कतर सरकारकडून अटक करण्यात आली. परंतु भारत सरकारकडून त्यांना सोडविण्यासाठी जे प्रयत्न करायला पाहिजे होते ते प्रयत्न झाल्याचे दिसत नाही.
जेव्हा की मोदी सरकार विश्र्वगुरू व महासत्ता बनल्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे जी-२० चे अध्यक्ष पद आणि बढाया मारणारे पीएम मोदी इतक्या छोट्याशा देशाला का घाबरले की आपल्या ८ सैनिकांचे प्राणसुद्धा वाचवू शकत नाही. एकीकडे कतारचे अमीर त्यांचे मित्र असल्याचे सांगितले जाते मग फोन करून देशाच्या सैनिकांना वाचवत का नाही?
हेही वाचा – चंद्रपूर : कोळसा व्यावसायिकाच्या कार्यालय, निवासस्थानी छापे; आयकर विभागाची कारवाई
हेही वाचा – चंद्रपूर : लॉयड्स मेटल कंपनीच्या वसाहतीचे अवैध बांधकाम थाबवा, काँग्रेसची मागणी
५६ इंच छातीचा वापर फक्त विरोधी पक्षातील नेत्यांच्या मागे ईडी लाऊन त्यांना जेलमध्ये टाकण्यासाठीच होतो का? असा प्रश्न आज देशाला पडला आहे, असे जगजीत सिंह म्हणाले. यावेळी अशोक मिश्रा, कविता सिंगल, ज्योति कन्हेरे, प्रकाश भलावी, गोविंद शेंडे, मोरेश्वर मौदेकर, केशव बांते, अहमद जवाद, अमित दुर्रानी, प्रज्ञाजित सोमकुवर, दया येत्ता, संदिप कोवे, सचिन चारोटे, आकाश वैद्य, मोहक पारवे, चेतन बंसोड, नमित सावरकर, राम मोहन चंडोक, सोनल मेश्राम उपस्थित होते.