नागपूर : महाराष्ट्रात भूतकाळातले प्रश्न काढले जातात, वर्तमान काय आहे याचा विचार केला जात नाही, त्यामुळे वर्तमानाला शोधायला आणि भविष्याला घडवायला हा स्त्री शक्तीचा संवाद ठेवला आहे. या माध्यमातून शिंदे सरकारचा अपयश जनतेसमोर मांडणार, असे मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी येथे सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून रश्मी ठाकरे यांच्या मागदर्शनाखाली महिला आघाडीच्या स्त्रीशक्ती संवाद यात्रेला मंगळवारी नागपुरातून सुरुवात झाली. या निमित्ताने किशोरी पेडणेकर नागपुरात आल्या असता त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यात्रेत महिलांचा जोश बघून तुम्हाला यात्रेची तयारी दिसली असेलच. स्त्री संवाद यात्रा महाराष्ट्रात काढण्यात येत असून त्याची सुरुवात विदर्भात केली जात आहे. नागपूर देशाचे मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्यामुळे आम्ही नागपूरची निवड केली आहे. येथून आम्ही मुंबईपर्यंत पोहोचणार आहोत. सर्व लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघात आम्ही जाणार असून त्या त्या भागातील महिलांशी संवाद साधणार आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाला लोकसभा किंवा विधानसभेच्या किती जागा मिळतील याबाबतचा निर्णय पक्षप्रमुख घेत असतात, त्यामुळे त्यावर आम्ही बोलणे योग्य नाही. महाविकास आघाडीचा जागेचा फॉर्म्युला ठरेल तेव्हा तो समोर येणारच आहे. आज मात्र जागावाटपपेक्षा जे जागेवर आहे त्यांना कशी चालना द्यायची, जे उद्धव ठाकरे यांच्यावर निष्ठा ठेवून त्यांच्यासोबत थांबले आहे, त्यांच्यासोबत संवाद करून वर्तमानातील काही प्रश्न आहेत यावर विचार करायचा आहे, असे पेडणेकर म्हणाल्या.

हेही वाचा – अनेक गाड्या होणार रद्द, वेळापत्रक कोलमडणार; रेल्वेने प्रवास करण्याआधी हे वाचाच

विदर्भातील महिला पदाधिकाऱ्यांशी संवाद करत महिलांचे संघटन कसे वाढवता येईल त्या दृष्टीने गावागावात जनसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. भूतकाळ हवाच, मात्र वर्तमान मजबूत हवा. आम्हाला कोणालाही जागा दाखवायची गरज नाही. जागा जनता दाखवणार. आम्ही फक्त आमच्या बरोबर असलेल्यांना त्यांच्यामध्ये जी उर्जा आहे त्या उर्जेला गती देण्याचे काम करणार आहोत, असेही पेडणेकर म्हणाल्या.

हेही वाचा – वाशीम : चक्क रस्त्यावर खाद्यतेल! महिला, पुरुष, लहान मुलांची एकच झुंबड…

विधानसभा अध्यक्षांनी निकाल विरोधात कसा लावला यावर उद्धव ठाकरे बोलतील. विधानसभा अध्यक्ष यांची स्क्रिप्ट दिल्लीवरून आली. मात्र एक स्क्रिप्ट जनतेमध्ये आहे, हे त्यांनी विसरू नये, असेही पेडणेकर म्हणाल्या.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why stri shakti samvad yatra what kishori pednekar said in nagpur vmb 67 ssb