अमरावती : जिल्‍हा परिषदेच्‍या शाळांतील शिक्षक आणि विद्यार्थ्‍यांचे इंग्रजी सुधारण्‍यासाठी पवित्र पोर्टल भरतीतून केंद्र स्‍तरावर साधन व्‍यक्‍ती म्‍हणून निवडल्‍या जाणाऱ्या शिक्षकाच्‍या नियुक्‍तीसाठी उमेदवाराचे शिक्षण इंग्रजी माध्‍यमातूनच झालेले असावे, अशी अट टाकण्‍यात आल्‍याने या निर्णयाला विरोध सुरू झाला आहे. इंग्रजी सुधारण्यासाठी साधनीभूत शिक्षक नेमणुकीसाठी महाराष्ट्र शासनाने उमेदवारांकडून अर्ज मागवतांना,उमेदवार हा इंग्रजी माध्यमातूनच शिकलेला असावा अशी जी अट घातली आहे ती अतिशय हास्यास्पद आहे.

तसेच मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्यांचे इंग्रजी हे सुधारित नसते व ते इंग्रजी सुधारण्यासाठी पात्र नसल्याचे जे सरकार ठरवते आहे ते नुसतेच भेदभाव करणारे, मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्यांवर अन्याय करणारे एवढेच नसून अशी पात्रता ठरवणाऱ्या प्रशासनाला, अधिकाऱ्यांना भाषा विषय आणि भाषा माध्यम यातला साधा फरकही कळत नसेल तर ते संबंधित खात्यात नियुक्तीसाठी मुळात पात्रच कसे ठरतात, असा प्रश्न देखील उपस्थित करणारे आहे. असे मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीतर्फे मुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्री यांना पाठविण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे.

Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Devendra Fadnavis, Mahesh Landge,
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
defence minister rajnath singh
Rajnath Singh: “डॉ. आंबेडकरांना भारतरत्न नरेंद्र मोदींनी दिला”, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा दावा
Due to assembly elections instructions have issued regarding school continuity on November 18 19
शाळा सुरू ठेवण्याबाबत शिक्षण आयुक्तांच्या सुधारित सूचना… होणार काय?
Akola Sessions Court sentenced family to death citing Mahabharata High Court disagreed
‘महाभारताचा’ उल्लेख करत फाशीची शिक्षा, उच्च न्यायालयाचे सत्र न्यायालयावर ताशेरे…
Those who do not accept Hindu Rashtra should go to Pakistan says Dhirendrakrishna Shastri
हिंदू राष्ट्र मान्य नसणाऱ्यांनी पाकिस्तानात चालते व्हावे, धीरेंद्रकृष्ण शास्त्रींचे वक्तव्य

हेही वाचा >>> यवतमाळ जिल्ह्यात ‘शिक्षण चेतना’ उपक्रम; ४६ मॉडेल स्कूलची निर्मिती होणार

सरकारचा हा नवा उद्योग ही सरकारच्या मराठी माध्यम रक्षणाची कृती नसून संबंधित रोजगार हा केवळ इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्यांसाठीच आरक्षित करत मराठी माध्यमातून शिकलेल्यांच्या इंग्रजी विषयावरील प्रभुत्वाचा अधिक्षेप आणि अवमान करणारा व म्हणून अतिशय संतापजनक व उद्विग्न करणारा आहे, असे डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी या पत्रात म्हटले आहे. मराठी माध्यमातून शिकलेल्यांच्या संधी अवरूद्ध करणारा व मराठी माध्यमाचेच अवमूल्यन करणारा आहे त्यामुळे या मराठी राज्यात मराठी माध्यमातील विद्वत्तेचे असे अवमानजनक अवमूल्यन करणारा संबंधित अट मुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्री यांनी हस्तक्षेप करून तातडीने मागे घ्यावी अशी विनंती डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केली आहे.