लोकसत्ता टीम

नागपूर : सुनीता राऊत या मुलगा अखिलेश, सून वैशाली आणि पाच वर्षांची नात स्विटीसोबत राहत होते. २०२३ मध्ये अखिलेशचा आजारपणात मृत्यू झाला. तेव्हापासून विधवा सून मुलगी व सासूसोबत राहायला लागली. एकाकी पडलेल्या वैशालीचे काही दिवसांत अनिल नावाच्या युवकासोबत सूत जुळले. तो तिच्या पतीचा मित्र होता.

pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Maharani Laxmi Bai Medical College, in Jhansi district
Jhansi Hospital Fire : नर्सने काडीपेटी पेटवली अन्… १० अर्भकांचा जीव घेणाऱ्या झाशी रुग्णालयात आग कशी लागली?
bihar man murder Mumbai
मुंबई: हातावर गोंदवलेल्या प्रेयसीच्या नावामुळे लागला हत्येचा छडा, प्रेमप्रकरणावरून बिहारमधील तरुणाची मुंबईत हत्या
emboldened rioters attacked police officer in nashik
पतीचा पत्नी, मेहुणी, सासऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला
women committed suicide pune, husband harassment,
पतीच्या छळामुळे दोन महिलांची आत्महत्या; कोंढवा, विमानतळ पोलिसांकडून गुन्हे दाखल
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू

दोघांचे प्रेमसंबंध बहरल्यानंतर चोरुन भेटी व्हायला लागल्या. तो सासू बाहेर गेल्यावर घरी यायला लागला. विधवा सूनेच्या प्रेमसंबंधाची कुणकुण सासू सुनीता यांना लागली. त्यामुळे त्यांनी कुटुंबाची इभ्रत वाचविण्यासाठी सुनेची समजूत घातली. तरीही दोघांचे प्रेमसंबंध कायम होते. त्यामुळे सासू वारंवार तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिविगाळ करायची. त्यामुळे सुनेने सासूचा काटा काढायचे ठरविले.

तिने आपले दोन्ही चुलत भाऊ श्रीकांत ऊर्फ समीर नरेंद्र हिवसे (२५) आणि रितेश प्रकाश हिवसे (२७, रा. भांडारगोंडी, ता. पांढुर्णा-मध्यप्रदेश) यांना कटात सहभागी करुन घेतले. सासूच्या मृत्यूनंतर दोन भूखंड आणि घर विकून पैसे मिळाल्यानंतर दोन लाख रुपये देण्याचे ठरविले. दोघांनीही सुनीता यांचा खून करण्यासाठी होकार दर्शविला.

आणखी वाचा-अर्ज करूनही ‘आरटीई’मध्ये अद्यापही प्रवेश मिळाला नसेल तर हे करा, शेवटची संधी

असे घडले हत्याकांड

सून वैशालीने २८ ऑगस्टला दोन्ही चुलत भाऊ रितेश आणि श्रीकांत यांना नागपुरात बोलावले. मध्यरात्री मागच्या दारातून घरात घेतले. वैशालीने सासूचे उशीने नाक-तोंड दाबले तर दोघांनी सासूचा गळा हाताने आवळला. मध्यरात्रीच दोघेही निघून गेले तर सूनेने दुसऱ्या दिवशी सासू हृदयविकाराच्या धक्क्याने मरण पावल्याचा बनाव केला. नातेवाईकांनीही सुनेच्या बोलण्यावर विश्वास करुन अंत्यसंस्कार पार पडले. अशा प्रकारे हत्याकांड दाबल्या गेले.

असा झाला उलगडा

अजनीचे ठाणेदार नितीनचंद्र राजकुमार आणि लक्ष्मण केंद्रे यांना सुनीता राऊत यांच्या मृत्यूबाबत संशय आला. घटनेच्या १२ दिवसांपर्यंत सूक्ष्म तपास केला. त्यांनी पाच वर्षांच्या मुलीला चॉकलेट-आईसक्रिम देऊन घटना विचारली. शेजाऱ्यांमध्ये जाऊन घटनेची चौकशी केली. वैशालीच्या हालचालींवर थोडा संशय बळावला. अंत्यसंस्कार झाल्यामुळे कोणताही धागा नसताना देखील तांत्रिक पुरावे गोळा केले. त्यात खात्री झाल्यानंतर वैशालीला ताब्यात घेतले. तिला वारंवार खोटे बोलत असल्याने तिला पोलिसी खाक्या दाखविल्या. त्यामुळे तिने सुपारी देऊन खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करुन हत्याकांड उघडकीस आणले.

आणखी वाचा-नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ सप्टेंबरला नागपुरात! वंदे भारत एक्सप्रेला…

दोन लाख रुपयांत सुपारी

विधवा सुनेचे एका युवकाशी प्रेमसंबंध असल्याची कुणकुण सासूला लागली. सुनेच्या प्रेमसंबंधात आड येणाऱ्या सासूचा सुनेने दोन लाख रुपयांत सुपारी देऊन खून केला. ही खळबळजनक घटना अजनीत उघडकीस आली. सुनीता ओंकार राऊत (५४, मित्रनगर, अजनी) असे खून झालेल्या सासूचे तर वैशाली अखिलेश राऊत (३२) असे आरोपी सुनेचे नाव आहे. अजनी पोलिसांनी या हत्याकांडात सहभागी असलेल्या दोघांना अटक केली. यापूर्वी, अजनीत अर्चना पुट्टेवार आणि प्रशांत पार्लेवार या बहिण भावाने सासरे पुरुषोत्तम पार्रेवार यांचा सुपारी देऊन खून केल्याची घटना काही दिवसांपूर्वीच उघडकीस आली होती, हे विशेष.