नागपूर : मानसिक आजारी पतीला विनाकारण सोडून गेल्यामुळे एका पत्नीस पोटगीसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. आधी यासंदर्भात अमरावती कुटुंब न्यायालयाने निर्णय दिला व पुढे त्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही शिक्कामोर्तब केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रकरणातील पत्नी अमरावती तर, पती मध्य प्रदेश येथील रहिवासी आहे. २००१ मध्ये त्यांचे लग्न झाले. पती ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये व्यवस्थापक होता. त्याला मानसिक आजार झाल्यामुळे पत्नी २०१५ मध्ये माहेरी निघून गेली. त्यानंतर तिने कुटुंब न्यायालयात पोटगीचा अर्ज दाखल केला होता. तो अर्ज नामंजूर झाल्यामुळे तिने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिकाही फेटाळल्या गेली.

हेही वाचा – देशाच्या विविध भागांत आज मुसळधार पावसाचा अंदाज

हेही वाचा – महिला पोलीसच असुरक्षित! थेट विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात तक्रार

मानसिक आजार झाल्यानंतर पतीला काळजी, सुरक्षा व प्रेमाची खरी गरज होती. अशावेळी पत्नीने पतीसोबत राहणे आवश्यक होते. पतीपासून तिला कोणताही धोका नव्हता, असे न्यायालयाने निर्णयात सांगितले. न्यायालयाने पत्नीला पोटगी नाकारताना तिच्या उत्पन्नाचा मुद्दाही विचारात घेतला. पत्नी एम. ए. व बी एड. पदवीधारक असून ती विद्यार्थ्यांची शिकवणी वर्ग घेते. परंतु, तिने उत्पन्नाची खरी माहिती दिली नाही. त्यावरून तिचा अप्रामाणिकपणा दिसून आला व ती स्वतःची देखभाल करण्यास असमर्थ असल्याचे सिद्ध झाले नाही.