अमरावती : पत्‍नीचे शेजारीच राहणाऱ्या युवकासोबत अनैतिक संबंध असल्‍याचा संशय पतीला होता. ते उघड करण्‍यासाठी त्‍याने झोप आल्‍याचे नाटक केले. त्‍यांचा माग घेतला आणि अनैतिक संबंधाचा उलगडा झाला. तळेगाव दशासर पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीत रविवारी रात्री ही घटना घडली. पत्‍नीचे शेजारीच राहणाऱ्या एका २० वर्षीय युवकासोबत अनैतिक संबंध असल्‍याचा संशय होता. ती सतत मोबाईलवरून या युवकासोबत व्‍हॉट्सअप, इन्‍स्‍टाग्रामच्‍या माध्‍यमातून चॅट करीत होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पतीने वैतागून गेल्‍या महिन्‍यातच पत्‍नीला समजावून सांगितले. मोबाईलचा जास्‍त वापर करू नको, असे त्‍याने पत्‍नीला बजावले होते. पण, तरीही ती ऐकण्‍याच्‍या मन:स्थितीत नव्‍हती. दरम्‍यान रविवारी रात्री पत्‍नी मोबाईलवर पुन्‍हा चॅट करताना दिसली. पत्‍नी कुणाला तरी भेटायला जाऊ शकते, असा संशय पतीला आला होता. पतीने झोपण्‍याचे नाटक केले.

हेही वाचा >>> महाराष्ट्राच्या भाजप आमदारांवर तेलंगणा निवडणुकीची जबाबदारी

पती निजल्‍याचे पाहून पत्‍नी हळूच घराबाहेर पडली. घराच्‍या दरवाजाची बाहेरची कडी तिने लावून घेतली. पतीला संशय होताच. त्‍याने ताराच्‍या सहाय्याने दाराची कडी उघडली. त्‍याने दुसऱ्या खोलीत जाऊन पाहिले, तर पत्‍नी शेजारीच राहणाऱ्या युवकाच्‍या बाहुपाशात आढळून आली. आपले बिंग फुटल्‍याचे पाहून पत्‍नी हादरली. तर शेजारी राहणाऱ्या युवकाने पतीला धक्‍काबुक्‍की केली आणि तो पळून गेला. पतीने लगेच तळेगाव दशासर पोलीस ठाण्‍यात पोहचून संबंधित युवकाच्‍या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.