अकोला: मावस दीरासोबत प्रेमसंबंध जुळल्याने पत्नीने पतीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना शहरातील खडकी परिसरात घडली. घटनेच्या तब्बल २५ दिवसानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील खडकी परिसरातील म्हाडा वसाहतीतील रहिवासी आकाश इंदोरे यांना त्याच्या पत्नीने २० नोव्हेंबरला प्रकृतीत बिघाड झाल्याने शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी खदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. पतीला दारूचे व्यसन होते. त्याला नेहमी रक्ताच्या उलट्या होत होत्या. मृत्यूच्या पंधरा दिवसापूर्वी त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या, असा बनाव पत्नीने केला. पोलिसांना हत्येचा संशय आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> थरारक..! औरंगाबाद जिल्ह्यातील महिलेची सैलानीत दगडाने ठेचून हत्या

तपासामध्ये पत्नी दिव्याचे पतीचा मावस भाऊ आकाश याच्यासोबत सूत जुळल्याचे समोर आले. घटनेच्या २५ दिवसांनी उत्तरीय तपासणीचा अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये आकाश इंदोरे यांचा गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून चौकशी केली. याप्रकरणी मृताची पत्नी दिव्या व मृताचा मावस भाऊ अजय संतोष माजरे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी गळा आवळून हत्या केल्याचे निष्पन्न झाले. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना १७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.