लोकसत्ता टीम

नागपूर : भारी कपडे, महागडा मेकअप आणि फिरायची सवय असलेल्या तरुणीचे कंपनीत मजूर असलेल्या युवकाशी लग्न झाले. घरात जेमतेम पैसे येत असल्यामुळे आर्थिक अडचण येत होती. तरीही पत्नी नेहमी पैशाची मागणी करुन आपली हौस पूर्ण करण्याचा हट्ट करीत होती. पतीच्या तुटपुंज्या पगारात काहीही होणार नाही, असे लक्षात आल्यानंतर पत्नीने थेट शरीरविक्री करण्याचा निर्णय घेतला. पती कामावर जाताच ती थेट लॉजवर जाऊन पैशासाठी आंबटशौकीन ग्राहकांच्या स्वाधीन होत होती. मात्र, तिचे बींग तब्बल दोन वर्षानंतर फुटले. सावनेरमधील विश्रांती लॉजवर छापा घालून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.

सावनेरमध्ये नागमंदिरजवळ आरोपी रुपेश ऊर्फ गोलू राधेशाम छिपारुषीया याचे विश्रांती लॉज आहे. तेथे आकाश मोतीराम खोब्रागडे हा व्यवस्थापक म्हणून काम करतो. शहराच्या एका कोपऱ्यात असलेल्या लॉजवर व्यवसाय होत नव्हता. त्यामुळे लॉज बंद करण्याची वेळ गोलूवर आली. त्यामुळे त्याने लॉजवर वेश्याव्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. व्यवस्थापक आकाश खोब्रागडे याला सांगून नागपूर शहारातील स्पा, मसाज पार्लर, ब्युटीपार्लर, सलून आणि पंचकर्माच्या नावावर देहव्यापार करणाऱ्या महिला दलालांशी संपर्क साधण्यास सांगितला. त्यासाठी त्याने देहव्यापारातील दलाल यश व्यवहारे याला हाताशी धरले. यश याने नागपुरात एका ब्युटीपार्लरमध्ये देहव्यवसायासाठी तरुणी आणि महिलांचा पुरवठा केला होता. त्यामुळे दलाल यशने काही तरुणींना सावनेरमधील लॉजवर देहव्यापार करण्यासाठी तरुणींना तयार केले. त्याच्या संपर्कात नागपुरातील नयना (वय २२, काल्पनिक नाव) ही संपर्कात आली. तिने आर्थिक अडचण असल्याचे सांगून देहव्यापार करण्याची तयारी दर्शविली. यशने तिला विश्रांती लॉजवर नेले आणि तेथे व्यवस्थापक आकाश याच्याशी भेट घालून दिली. आकाशने तिला जाळ्यात ओढले. तो ग्राहकांना नयनाची ओळख ही प्रेयसी असल्याचे सांगत होता.

आणखी वाचा-“उद्धव ठाकरेच मुख्‍यमंत्री व्‍हावेत..”, आमदार यशोमती ठाकूर यांच्‍या वक्‍तव्‍याची चर्चा

कारने येणे जाणे

नयनाचा पती सकाळी ८.३० वाजता कामाला जात होता आणि रात्री ९ वाजता परत येत होता. त्यामुळे नयनाने सकाळी १० वाजतापासून ते सायंकाळपर्यंत देहव्यापार करण्याचा निर्णय घेतला. तिला घेण्यासाठी रोज कार तिच्या घरासमोर येत होती. पतीच्या कमाईत तिची हौस पूर्ण होत नसल्यामुळे नयना लॉजवर रोज देहव्यापार करीत होती. तिच्या कृत्याची पतीला कुणकुण नव्हती.

आणखी वाचा-नागपुरातील गुंडांच्या टोळ्यामध्ये पिस्तूलांचा सर्रास वापर, पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय

छापा पडला आणि बींग फुटले

सावनेरचे ठाणेदार पाटील यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक मंगला मोकासे यांनी एका बनावट ग्राहकाला लॉजवर पाठवले. आकाशकडे तरुणीची मागणी केली. त्याने नयनाला बोलावले आणि प्रेयसी असल्याची ओळख करुन दिली. त्या ग्राहकाने ५ हजार रुपयांत सौदा पक्का केला. नयना आणि त्या ग्राहकाला आकाशने लॉजमधील खोली उपलब्ध करुन दिली. त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी छापा घालून नयनासह आंबटशौकीन ग्राहकांना ताब्यात घेतले. नयनाला कुटुंबियांच्या ताब्यात देण्यासाठी तिच्या पतीला बोलावण्यात आल्याने पत्नीचे बींग फुटले.