लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकोला: वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शहरातील मोहम्मद अली मार्गावरील अमरसिंह आयुर्वेदिक औषधी दुकान व गोदामावर छापा टाकला. यामध्ये वन्यप्राण्यांचे अवशेष, नखे, शिंग आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणी वनविभागाने चार आरोपींना अटक केली असून त्यांना एक दिवसाची वनकोडठी सुनावण्यात आली आहे.

मोहम्मद अली मार्गावर अमरसिंह आयुर्वेदिक जुडी, बुटी औषधांचे दुकान आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे दुकान या परिसरात आहे. शासनाद्वारे प्रतिबंधित वपस्पती व वन्यजीवांच्या अवशेषाची विक्री होत असल्याची माहिती अकोला वनविभागाला मिळाली. त्यानुसार वनविभागाने दुकानावर छापा टाकला. तसेच मानेक टॉकीजच्या मागे तीन ते चार गोदाम आहेत. तेथेही तपासणी करण्यात आली. या सर्व ठिकाणी विक्रीस प्रतिबंधित वस्तू निदर्शनात आल्या. यावेळी बारसिंग, घोरपडीचे अवशेष, वन्यप्राण्यांचे नखे, काळविट शिंग, सायाळचे काटे, कासवाची पाठ, शंख, चंदनाचे लाकडे, खैराचे तुकडे, दुर्मीळ वनस्पती आदी साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी अजयसिंग प्रतापसिंग परमार (ठाकूर), माधव राजेंद्रसिंग परमार, विलास रामचंद्र मनोहर, अनिल गणपत गायकवाड या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा… काय सांगता…? काँग्रेस-भाजप युती, तिही निवडणुकीसाठी! वाचा कुठे घडला हा प्रकार…

वनकायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना एक दिवसाची वनकोठडी सुनावण्यात आली आहे. अकोला वनपरिक्षेत्र उपवनसंरक्षक के.आर. अर्जुना, सहायक उपवनसंरक्षक सुरेश वडोदे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला वनपरिक्षेत्र अधिकारी एस.जी. डांगे, वनपाल इंगळे, वनरक्षक मोरे आदींच्या पथकाने केली.

हेही वाचा… पाणथळ संवर्धनात भारताची कामगिरी उत्तम; रामसर यादीत ७५ पाणथळ ठिकाणे

अमरसिंह आयुर्वेदिक औषधी दुकानात प्रतिबंधित वपस्पती व वन्यजीवांच्या अवशेषाची विक्री होत असल्याच्या माहितीवरून छापा टाकण्यात आला. यावेळी वन्यप्राण्यांच्या अवशेषासह इतर साहित्य जप्त करण्यात आले असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सखोल तपास सुरू आहे, अशी माहिती अकोला वनपरिक्षेत्र अधिकारी एस.जी. डांगे यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wildlife remains in ayurvedic medicine shop four accused arrested by forest department in akola ppd 88 dvr
Show comments