नागपूर : विधानसभेच्या नागपूर अधिवेशनानिमित्त प्रथेप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महायुतीच्या आमदारांना गुरुवार, १९ डिसेंबरला सकाळी ८ वाजता संघ कार्यालयात निमंत्रित केले आहे. मात्र यावेळी तरी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पक्षाचे आमदार तेथे जाणार की ‘दक्ष’ता दाखवून संघ मुख्यालयात जाणे टाळणार, याकडे लक्षलागले आहे.

भाजप आणि शिवसेनेचे आमदार उपस्थित राहणार असल्याची माहिती असली तरी अजित पवार आणि त्यांच्या पक्षाचे आमदार संघाच्या बौद्धिक वर्गाला जाणार का, याची चर्चा नागपूरच्या राजकीय वर्तुळात आहे. विशेष म्हणजे, गेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादीच्या आमदारांनी या संघपरिचय वर्गाकडे पाठ फिरवली होती. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाचे आमदार रेशीमबागेतील स्मृतिमंदिर स्थळी जाऊन आद्या सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतात. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर २०२३ मध्ये नागपुरात झालेल्या अधिवेशनादरम्यान संघाकडून परिचय वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अजित पवार यांनी दोनदा संघ मुख्यालयात जाणे जाणे टाळले होते.

हेही वाचा >>>विधान परिषद सभापतीपदासाठी भाजपच्या राम शिंदेंच्या नावार शिक्कामोर्तब

ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

गुरुवारी सकाळी स्मृतिमंदिर स्थळी आयोजित संघ परिचय वर्गात येणाऱ्या आमदारांना संघाचे विदर्भ प्रांतसंघचालक श्रीधर गाडगे आणि महानगर संघचालक राजेश लोया हे मार्गदर्शन करणार आहेत. संघातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध सेवाकार्यांबाबत ते माहिती देतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महायुतीच्या सर्व आमदारांना स्मृतिमंदिर येथे उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिले आहे. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पक्षाचे आमदार उपस्थित राहणार का? याची उत्सुकता आहे.