OBC Reservation Bhoyar Pawar Community News : ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे म्हणून मराठा समाजाने मागणी रेटली तर त्यास ओबीसी घटकांनी कडाडून विरोध दर्शविला. आता याच प्रवर्गातील एका घटकास आरक्षण देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.
हेही वाचा – ‘एफबी फ्रेंड’कडे विवाहित महिला गेली नांदायला अन…
प्रामुख्याने कारंजा घाडगे तसेच गोंदिया, भंडारा जिल्ह्यात तसेच मध्यप्रदेशच्या काही भागांत भोयर पवार या समाजाचे प्राबल्य आहे. या समाजास राष्ट्रीय मागासवर्ग यादीत समावेश करण्याबाबत एक महत्त्वाची बैठक १७ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने आयोजित केली आहे. त्यामुळे भोयर पवार समाजाला केंद्र सरकारच्या नोकऱ्यांत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याचा मार्ग या बैठकीच्या माध्यमातून सूकर होणार आहे, अशी पोस्ट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सुमित वानखेडे यांनी सोशल मीडियावर टाकली आहे. या घडामोडीबद्दल त्यांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर तसेच फडणवीस यांचे आभारपण मानले आहे.