वर्धा : राज्य शिक्षण मंडळाने विनंती केल्यानंतर मुख्याध्यापक संघटनेच्या संघाने परीक्षा घेण्यास सहकार्य करण्याची भूमिका घेतली. मात्र आता एवढेच सहकार्य, उत्तरपत्रिका तपासण्यास सांगू नका. जुन्या पेन्शनचा प्रश्न सुटेल तेव्हाच दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तपासून देऊ, अशी रोखठोक भूमिका संघटनेने घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – नागपूर: स्वाईन फ्लूच्या जनुकीय बदलातून बदलातूनच ‘एच-३ एन २’; पद्मश्री डॉ. गुलेरिया यांची माहिती

हेही वाचा – नागपूर: डॉ. आंबेडकर भवन पाडल्याचा मुद्दा विधानसभेत

उत्तरपत्रिका तपासून मंडळाच्या हाती दिल्यावरच परीक्षेची प्रक्रिया पूर्ण होते. विद्यार्थी हिताची भूमिका म्हणून शिक्षक संघटनांनी परीक्षा केंद्रावर हजर राहण्यास तयारी दर्शविली. खरा तिढा बुधवारी होणाऱ्या गणिताच्या दुसऱ्या पेपरला निर्माण होण्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षक व मुख्याध्यापक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शिक्षण विभागाने घेतली. परीक्षा काढून देऊ. काळ्या फिती राहणार. पण त्यानंतर मदतीची अपेक्षा ठेवू नका. प्रश्न सुटल्यावरच उत्तरपत्रिका हाती घेऊन तपासू. आश्वासनाचे तुणतुणे नको, असे नेत्यांनी स्पष्ट केल्याने अधिकाऱ्यांच्या कपाळावर आठे उमटले. शासन आम्हास नेहमी गुरुजीच्या भूमिकेत पाहते. कुटुंबप्रमुख म्हणून आमच्याकडे लक्ष देऊन पेन्शन मान्य करावी, अशी मागणी मुख्याध्यापक संघटनेचे सतीश जगताप यांनी केली आहे.