नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ५ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या सीमेलगतच्या मध्यप्रदेशमध्ये दौरा असून, तेथे जाण्यासाठी ते गोंदिया येथील बिरसी विमानतळावर उतरण्याची शक्यता आहे. त्यांच्या या दौऱ्याविषयी गोपनीयता बाळगण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यात विधानसभा निवडणुका आहेत. भाजपासाठी या दोन्ही राज्यांतील निवडणुका महत्त्वाच्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – सरकारच्या गलथानपणामळे ५० ओबीसी विद्यार्थी अडचणीत – वडेट्टीवार

हेही वाचा – केंद्रीय माध्यमिक शिक्षक पात्रता परीक्षेची तारीख जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी ५ नोव्हेंबर रोजी दौरा आयोजित करण्यात आला आहे. त्यांचा हा दौरा नेमका मध्यप्रदेशात की छत्तीसगडमध्ये आहे, या विषयी गोपनीयता बाळगण्यात आली आहे. काहींच्या मते पंतप्रधानांचा हा दौरा बालाघाट जिल्ह्यात तर काहींच्या मते छत्तीसगढमध्ये असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या दौऱ्यासाठी पंतप्रधान दिल्ली येथून विशेष विमानाने बिरसी विमानतळावर येतील व तेथून हेलिकॉप्टरने पुढील दौऱ्यावर रवाना होतील. प्रचार सभेनंतर परत येऊन विशेष विमानाने दिल्लीकडे प्रयान करतील. पंतप्रधानांच्या या दौऱ्यानिमित्ताने बिरसी विमानतळ परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will pm narendra modi come to gondia cwb 76 ssb