गडचिरोली : महाराष्ट्र राज्यासह देशभर भाजपविरोधी वातावरण असताना ‘एक्झिट पोल’चे आकडे म्हणजे ‘दाल में कुछ काला है,’ असे असून गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राची जागा हरल्यास राजकीय सन्यास घेणार, अशी घोषणा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत वडेट्टीवार म्हणाले की, इंडिया आघाडी विदर्भात १०, तर राज्यात ३५ जागा जिंकेल. प्रचारादरम्यान आम्ही घेतलेल्या सभांना लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. परंतु सत्ताधाऱ्यांना आनंदी करण्यासाठी ‘एक्झिट पोल’चे आकडे भाजपच्या समर्थनार्थ दिले गेले. मतमोजणीस उशीर झाला तरी चालेल, मात्र ‘सी-१७ फॉर्म’ आणि मशिनबरोबरच लावून येणाऱ्या फॉर्मची आकडेवारी जुळल्याशिवाय एव्हीएम मशिन उघडली जाऊ नये, अशी सूचना आपण केल्याची माहितीही वडेट्टीवार यांनी दिली.

BJP leaders Demand to Give a chance to the old workers while pampering the new ones
हरियाणा विधानसभा निवडणूक : चार वर्षांपूर्वी धुमधडाक्यात सुरु केलेली ‘ती’ योजना भाजपासाठी अडचणीची ठरणार?
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Amit Shah on Maharashtra Assembly Election
Amit Shah: अमित शाह यांचा बैठकांचा सपाटा; देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व, गडकरींची अनुपस्थिती, मराठा आंदोलनाच्या प्रश्नांवर काय म्हणाले?
satyapal malik
राज्यात भाजपचा सुपडा साफ होईल- सत्यपाल मलिक
Counter movement by OBC leaders opposing Manoj Jarange agitation for Maratha reservation demand
आंतरवलीजवळ आंदोलकांच्या घोषणाबाजीमुळे तणाव; आंदोलनप्रतिआंदोलनाने वाद
Dharavi News in Marathi
Dharavi Masjid : धारावीत मशिदीचा बेकायदेशीर भाग तोडण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या गाडीची तोडफोड, शेकडो मुस्लिमांचा जमाव एकवटला
supriya sule on balasaheb thorat cm post statement
Supriya Sule : “राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल”, बाळासाहेब थोरातांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाल्या…
jayant patil appeal bachchu kadu
Jayant Patil : राज्यात तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरु असतानाच जयंत पाटलांचे बच्चू कडूंना आवाहन; म्हणाले…

हेही वाचा – चंद्रपूर : मी माझ्या विजयाबद्दल आश्वस्त, प्रतिभा धानोरकर यांचा दावा

निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांना नोटीस बजावली. परंतु भाजप ही निवडणूक धार्मिक मुद्यांवर लढत असताना आयोग गप्प का होता, एका मतदारसंघात मतदान सुरू असताना बाजूच्या मतदारसंघात प्रचार सभा घेतल्या गेल्या, तो आदर्श आचारसंहितेचा भंग नाही का, असे प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केले.

हेही वाचा – आनंदवार्ता! सोन्याचे दर आणखी खाली, जाणून घ्या आजचे दर… 

गडचिरोली-चिमूर क्षेत्रातील निवडणूक ही लोकांनीच हातात घेतली होती. लोकांमध्ये सत्ताधाऱ्यांविरुद्ध प्रचंड राग होता. असे असतानाही ‘एक्झिट पोल’ भाजपच्या बाजूने कौल दाखवत असेल, तर ‘दाल में कुछ काला है’, असे समजण्यास भरपूर वाव आहे आणि ही निवडणूक काँग्रेस पक्ष हरला तर राजकीय संन्यास घेऊ, अशी घोषणाही वडेट्टीवार यांनी केली.