अकोला : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता मुख्यमंत्र्यांचा शपथविधी व मंत्रिपदावर कुणाला संधी मिळणार याची चर्चा रंगली आहे. अकोला जिल्ह्यात मंत्रिपदाची पाच वर्षांपासूनची प्रतीक्षा संपणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले. भाजपच्या कोट्यातून जिल्ह्याला मंत्रिपदाची संधी मिळू शकते. अकोला पूर्व मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने निवडून आलेले आमदार रणधीर सावरकर यांचे नाव जिल्ह्यातून मंत्रिपदासाठी अग्रक्रमावर असल्याची माहिती आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. आता सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजपला तीन, तर काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटाला प्रत्येकी एक जागा मिळाली. जिल्ह्याला २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळालेले नाही. पाच वर्षांपासून जिल्ह्यात स्थानिक मंत्री नाहीत. मविआ सरकारमध्ये बच्चू कडू, तर महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस व राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी होती. आता जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री मिळाले पाहिजे, अशी नागरिकांची आग्रही भूमिका आहे. भाजपसह महायुतीच्या पारड्यात मतांचे भरभरून दान टाकणाऱ्या अकोलेकरांची आता भाजप उपेक्षा करणार नाही, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला १६ जागी मताधिक्‍य, विधानसभेत मात्र…

नव्या सरकारमध्ये अकोला जिल्ह्यातून अकोला पूर्वचे आमदार तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर यांचे नाव चर्चेत आहे. अकोला पूर्वतील मतदारांनी प्रथमच एकाच आमदाराला तिसऱ्यांदा संधी दिली. आ. सावरकरांनी हॅटट्रिकचा इतिहास करण्यासोबतच ५० हजार ६१३ मताधिक्यासह शिवसेना ठाकरे गट व वंचितचा मोठा पराभव केला. पक्षात मजबूत पकड असून त्यांचा शब्द अंतिम मानल्या जातो. लोकसभा निवडणुकीत अकोला मतदारसंघाचा बालेकिल्ला कायम राखण्यात आ. सावरकरांचा सिंहाचा वाटा होता. आता विधानसभेत अकोट व मूर्तिजापूरची जागा निवडून आणण्यात देखील त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. अभ्यासू आमदार म्हणून रणधीर सावरकर यांची ओळख असून देवेंद्र फडणवीसांचे ते निकटवर्तीय आहेत. कॅबिनेट किंवा राज्यमंत्रीपदासाठी त्यांच्या नावाचा गांभीर्याने विचार होऊ शकतो, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.

हेही वाचा – महायुतीत यवतमाळला तीन मंत्रिपदांची लॉटरी? संजय राठोड, अशोक उईके, इंद्रनील नाईकांची नावे…

हरीश पिंपळे व प्रकाश भारसाकळेंच्या नावाचीही चर्चा

मूर्तिजापूर मतदारसंघातून भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांनी सलग विजयाचा चौकार लगावला. अकोट मतदारसंघात विजयी होण्याची प्रकाश भारसाकळेंनी हॅटट्रिक केली. त्यामुळे मंत्रिपदासाठी हरीश पिंपळे व प्रकाश भारसाकळे यांच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे. आता कुणाला मंत्रिपदावर संधी मिळते, याकडे अकोला जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.