वर्धा : केंद्रीय कामगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी जिल्ह्यात कामगार रुग्णालय देण्याची घोषणा केली. खासदार रामदास तडस यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आयोजित झालेल्या कामगार मेळाव्यात त्यांनी केलेली ही घोषणा तडस यांना जन्मदिनाची भेट म्हणून चर्चेत आली. पण हे शक्य आहे का, अशी चर्चा आता होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रुग्णालय झाल्यास फार मोठा लाभ कामगार कुटुंबास होईल. केवळ मासिक शंभर रुपये शुल्कात परिवारातील सदस्यावर उपचार होतील. नागपूर व बुटीबोरी पाठोपाठ हे तीसरेच असे विदर्भातील रुग्णालय ठरणार. प्रमुख निकष म्हणजे जिल्ह्यात किमान एक लाख कामगारांची नोंदणी हवी. सध्या पस्तीस हजारच आहेत. बांधकाम कामगार यात जोडल्यास अपेक्षित नोंदणी शक्य होणार असल्याचे एका कामगार नेत्याने स्पष्ट केले. केंद्राचा निधी व राज्य शासनाचे व्यवस्थापन राहणार. राज्य कर्मचारी विमा निगम या संस्थेच्या अखत्यारीत हे रुग्णालय राहणार. खासदार यांनी मागणी केल्याने घोषित केल्याचे मंत्री म्हणाले.

हेही वाचा – नागपूर: सरकारकडे पैशांची कमतरता, विकास कामांसाठी गडकरी यांनी दिला पर्याय; म्हणाले…

हेही वाचा – चंद्रपूर : विहिरीत पडून मादी बिबट्याचा मृत्यू

सर्व निकष जुळून आल्यावर रुग्णालय झाल्यास सेवाग्राम, सावंगी व नियोजित सातोडा येथील शासकीय महाविद्यालय व रुग्णालयसह हे चौथे आरोग्य सेवेचे दालन उघडणार.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will there be a labor hospital in wardha pmd 64 ssb