लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्धा: महानुभवपंथीयांची काशी म्हणून रिध्दपुर या धार्मिक क्षेत्राची सर्वत्र ओळख आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी विधानसभा व वर्धा लोकसभा मतदासंघात येणाऱ्या या गावाची लोकसंख्या अवघी सात हजार एवढीच.तरीही या ठिकाणी रेल्वे स्थानक व्हावे म्हणून प्रयत्न सुरू झाले आहे.

कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या येथील भेटीत या गावात स्वतंत्र मराठी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली होती. सोबतच विकास आराखडा तयार करण्याची सूचना केली. यावेळी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू रजनीश कुमार यांनी विद्यापीठाचे अभ्यास केंद्र सुरू करण्याची भूमिका मांडून त्याचा अंमल पण केला.

आणखी वाचा- अमरावती : बसस्‍थानकावर चोरट्यांचा धुमाकूळ; दोन महिलांच्‍या पर्समधून लाखोंचा ऐवज लंपास

भविष्यात हे भव्य धार्मिक स्थळ व शिक्षणाचे मोठे केंद्र होणार, हे निश्चित. याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी रेल्वे स्थानक व्हावे म्हणून प्रस्ताव तयार करण्यात आला. तो रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. त्यास मंजुरी मिळावी म्हणून खासदार रामदास तडस हे पाठपुरावा करीत आहे. रेल्वे मंत्री आश्विन वैष्णव यांची त्यांनी नुकतीच दिल्लीत भेट घेतली होती.

या भेटीत त्यांनी रिध्दपुर येथील रेल्वे स्थानकाचा प्रस्ताव त्वरित मंजूर करावा म्हणून आग्रह धरला. हा प्रस्ताव मंजूर करण्याबाबत रेल्वे मंत्री सकारात्मक असल्याचे खा. तडस यांनी सांगितले.