लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वर्धा : पाणी किंवा वीज पुरवठा अनिश्चित काळासाठी ठप्प झाल्यास शहरात चांगलीच खळबळ उडते. नागरिक प्रशासनाच्या नावे ओरड करायला सुरुवात करतात. त्यामुळे मग प्रशासन पण दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचा बचावत्मक पवित्रा घेते. वर्धा शहरात आता असेच झाले आहे. शनिवारी रात्रीस पाणी पुरवठा बंद होणार असल्याचे सांगण्यात आले.
तसेही तीन दिवसाआड नळास पाणी येते. आता ते पण आगामी काही दिवसात मिळणार नाही. शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिकेस तडे गेलेत. त्यातून पाणी वाहने सुरू झाल्याने त्वरित दुरुस्ती आवश्यक ठरली. हा पाणी पुरवठा महाकाली धाम या धरणातून होतो. येळकेळी परिसरात काम सुरू झाले आहे. मात्र त्यास विलंब लागणार. दुरुस्ती कार्य किती दिवस चालणार, हे अनिश्चित आहे. त्यामुळे नागरिकांनी जपून पाणी वापरावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
आणखी वाचा-असा गुरु, असा शिष्य! मंत्रिपद मिळाल्यानंतर प्रथम भेट सावंगीत…
पालिकेचे माजी सभापती नीलेश किटे म्हणाले की, दुरुस्ती लक्षात येताच पाणी पुरवठा विभाग कामाला लागला. मात्र काम मोठे असल्याने वेळ लागणारच. आज नागपुरातून नवा पाईप आणल्या जाईल. त्याची फिटिंग करण्याचे काम सोपे नसल्याने वेळ लागणार. नागरिकांनी थोडी कळ सोसावी.
इकडे वर्धा शहरातील काही भाग या अडचणीने प्रभावित होणार आहे. राष्ट्रसंत चौक आर्वी नका, प्रतापनगर, म्हाडा कॉलोनी, गजानन नगर, बॅचलर रोड परिसर, साबळे प्लॉट, राधा नगर, मानस मंदीर परिसर, गोरस भंडार कॉलोनी, गांधी नगर, साने गुरुजी नगर, सुदामपुरी, गोंड प्लॉट, यशवंत कॉलोनी, खडसे लेआउट, इंदिरा नगर, केळकरवाडी या भागात पाणी येणार नाही. दुरुस्ती होण्यास किमान तीन ते चार दिवस लागण्याची शक्यता व्यक्त होते. तरीही काही माध्यमातून पाणी पुरवठा करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. जुना पाणी चौकात लिकेज दुरुस्तीचे काम अहोरात्र करण्यात येत आहे.
आणखी वाचा-तर पीक विम्याच्या बोगस प्रकरणाची सखोल चौकशी- देवेंद्र फडणवीस
वर्धा शहरात महाकाली धाम येथून तसेच पवनार पंपिंग स्टेशन येथून पाणी पुरवठा केल्या जात असतो. मात्र भविष्यात हा पुरवठा अपुरा ठरू शकतो. त्यादृष्टीने १३ गावांसाठी विशेष पाणी पुरवठा योजना प्रस्तावित आहे. मात्र अद्याप हालचाल नाही. सध्या या दुरुस्तीमुळे शहराचा निम्मा परिसर पाण्यापासून वंचित असून उर्वरित भागात मात्र पाणी पुरवठा सुरळीत सुरू असल्याचे सांगण्यात येते.