नागपूर: नागपूरसह देशभरात सोन्याचे दर नियंत्रणात येत नाही. दरम्यान हल्ली नागपूरसह राज्यातील काही भागांत थंडी कायम आहे. परंतु, सोन्याच्या दरात सातत्याने होणारी दरवाढ बघून सोने-चांदीचे दागिने खरेदीसाठी इच्छुक ग्राहकांना थंडीतही घाम फुटला आहे. सोन्याचे दर बुधवारी विक्रमी उंचीवर पोहोचले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूरसह राज्याच्या विविध भागांत हल्ली लग्न, वाढदिवसासह इतरही कार्यक्रमांचे आयोजन वाढले आहे. या कार्यक्रमात आजही अनेक नागरिक सोने- चांदीचे दागिने वा इतरही वस्तू भेट देत असतात. त्यामुळे आता नागपुरातील सराफा व्यावसायिकांकडे ग्राहकांची गर्दी दिसत आहे. या ग्राहकांकडून लग्न असल्यास मंगळसूत्र वा इतर दागिने, बारसे असल्यास बाळासाठी चाळ तर इतरही ग्राहकांकडून विविध कार्यक्रमानुसार दागिन्यांना मागणी आहे.

दरम्यान, नववर्षात सोन्याचे दर वाढल्याने ग्राहकांमध्ये चिंता होती. नागपुरातील सराफा बाजारात १ जानेवारी २०२५ रोजी सोन्याचे दर प्रति दहा ग्राम ७६ हजार ९०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७१ हजार ५०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६० हजार रुपये, १४ कॅरेटसाठी ५० हजार रुपये नोंदवले गेले होते. हे दर २४ जानेवारी २०२५ रोजी २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ८० हजार ७०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७५ हजार १०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६२ हजार ९०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५२ हजार ५०० रुपये नोंदवले गेले. हे दर एक दिवसापूर्वी २९ जानेवारीला २०२५ रोजी २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ८१ हजार २०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७५ हजार ५०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६३ हजार ३०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५२ हजार ८०० रुपये होते. त्यामुळे राज्यात १ जानेवारी २०२५ रोजीच्या तुलनेत २९ जानेवारी २०२४ रोजी सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ४ हजार ३०० रुपये, २२ कॅरेटसाठी ४ हजार रुपये, १८ कॅरेटसाठी ३ हजार ३०० रुपये, १४ कॅरेटसाठी २ हजार ८०० रुपये वाढल्याचे दिसत आहे.

चांदीच्या दरातही मोठे बदल…

नागपुरातील सराफा बाजारात नववर्षाच्या पहिल्या दिवशी १ जानेवारी २०२५ ला चांदीचे दर ८६ हजार ७०० रुपये प्रति किलो होते. हे दर २९ जानेवारी २०२५ रोजी ९१ हजार ६०० रुपये प्रति किलो नोंदवले गेले. त्यामुळे १ जानेवारी २०२५ रोजीच्या तुलनेत नागपुरात २९ जानेवारी २०२५ रोजी चांदीच्या दरात ४ हजार ९०० रुपये प्रति किलो वाढ नोंदवली गेली आहे.