लोकसत्ता टीम
नागपूर : विदर्भात तापमानाचा पारा सर्वाधिक असताना याच विदर्भात हिवाळ्यात तापमानाचा पारा सर्वाधिक कमी झालेला सुध्दा दिसून आला आहे. मात्र, यंदा डिसेंबर उगवला तरी थंडीला सुरुवात झाली नाही. त्यामुळे यंदा विदर्भातून थंडी गायब झाली की काय, असा प्रश्न वैदर्भीयांना पडला आहे.
आणखी वाचा-चंद्रपुरच्या प्रदुषणात नोव्हेंबरमध्ये पुन्हा वाढ; जाणून घ्या कारणे व दुष्परिणाम
भारतीय हवामान खात्याने डिसेंबर महिन्यात थंडीला सुरुवात होईल असे सांगितले होते. मात्र, आता विदर्भाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातच यंदा थंडी कमी राहील, असे सांगितले आहे. पाऊस कमी पडल्यामुळे किमान तापमान देखील अधिक राहील. सध्या विदर्भात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे अचानक थंडी आणि अचानक उकाडा असे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात केवळ दोन दिवस किमान तापमानात मोठी घट झाली होती. मात्र, आता पुन्हा थंडी गायब होऊन उकाडा जाणवू लागला आहे. विदर्भात पाच वर्षांपूर्वी याच डिसेंबर महिन्यात २०१८ साली ३.५ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर कधीही तापमानाचा निच्चांक नोंदवला गेला नाही.