नागपूर : सोमवारपासून (१६ डिसेंबर) सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह विधानसभेतील विरोधी पक्ष नेत्याचा बंगलाही सज्ज झाला आहे, पण अद्याप नेताच न ठरल्याने अनिश्चिता कायम आहे.
दरवर्षी होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची लगबग न ागपुरात सुरू झाली आहे. गुरूवारपासून विधिमंडळाचे सचिवालय नागपुरात सुरू होणार आहे. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान रामगिरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ‘देवगिरी’ आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी ‘विजय गड’ सज्ज झाले आहे. या बंगल्यांची रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे विधानसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती, उपसभापतीं व विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचे बगलेही त्यांच्या आगमनाच्या प्रतिक्षेत आहे. अपवाद ठरला आहे तो विधानसभेच्या विरोधी पक्ष नेत्यांच्या बंगल्यांचा. रविभवनातील हा बंगला सर्व सोयींनी सूसज्ज ठेवण्यात आला आहे. तेथे मंडपही टाकण्यात आला आहे,पण अद्याप विरोधी पक्ष नेता न ठरल्याने तेथे नामफलक लावण्यात आला नाही.
हेही वाचा >>>यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
२८८ सदस्यांच्या विधानसभेत एकाही पक्षाकडे विरोधी पक्ष नेतेपदासाठी आवश्यक संख्याबळ नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष यांच्या इच्छेवरच विरोधी पक्ष नेत्यांच्या नियुक्तीचा निर्णय अवलंबून आहे. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विरोधी पक्षनेता नियुक्ती केली होती. त्याला फडमवीस यांनी सकारात्मक प्रतिसादही दिला होता. परंतु विशेष अधिवेशन आटोपूनही काही दिवस गेले तरी अद्याप याबाबत काहीच हालचाली झालेल्या दिसत नाही.
हेही वाचा >>>नागपूर : झटपट पैशांचे आमिष! महाविद्यालयीन तरुणींकडून देहव्यापार, ‘हेवन स्पा’मध्ये सेक्स रॅकेट….
विरोधी पक्ष नेता नियुक्तीला सत्ताधाऱ्यांनी मान्यता दिल्यास महाविकास आघाडीकडून कोणत्या पक्षाच्या नेत्याचे नाव सूचवले जाईल याबाबतही अनिश्चितता आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते पद शिवसेनेकडे असल्याने विधानसभेतील विरोधी पक्ष नेतेपदावर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी दावा करू शकते, परंतु राष्ट्रवादीचे सर्वात कमी (१०) संख्याबळ आहे. काँग्रेसकडे यापूर्वी हे पद होते. त्यामुळे सध्याच्या स्थितीत आगाडीत सर्वाधिक सदस्य संख्या (२०) असलेल्या शिवसेना ठाकरे गट या पदासाठी आग्रह धरू शकते. दोन दिवसात याबाबत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
परंपरेप्रमाणे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याच्या निवासस्थांनी विरोधकांची पत्रकार परिषद होते. त्यासाठी नागपुरात त्याच्या बंगल्यावर मंडप उभारणी करण्यात आली आहे. मात्र नेताच निश्चित नसल्याने यावेळी विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्याच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षाला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असतो. हे येथे उल्लेखनीय.