वर्धा : सावंगी येथील दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाचे प्रशासन अधिकारी मयूर चंद्रकांत देशपांडे यांनी सावंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली अन् ते पाहून पोलीसही संभ्रमात पडले. गुन्हाही तसाच आणि उमलत्या पिढीस कोमेजून टाकणारा. पोलीस यंत्रणा तडकाफडकी कामास लागली. आरोपीने इंस्टाग्राम या सोशल मीडिया खात्यावर डीएमआयएमएस कॉन्फेशन या नावाने पेज तयार केले. त्यावर एक लिंक टाकली. कोणताही विद्यार्थी सदर वेब पेजवर जाऊन त्याला वाटेल अशी कोणतीही माहिती टाकत असे. पुढे या पेजचा ऍडमिन अधिकार असलेला आरोपी या वेब पेजवर विद्यार्थ्यांनी टाकलेली पोस्ट स्वतःच्या पेजवर वळवीत होता.

हेही वाचा >>> Buddhana Crime : भयंकरच… मुलाने मित्राच्या मदतीने केली वडिलांची हत्या, पुरलेल्या मृतदेहाच्या शर्टावरून…

Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Mira Road Riot Case, Bail to 14 Muslim Youths,
मीरा रोड दंगल प्रकरण : १४ मुस्लिम तरुणांना उच्च न्यायालयाकडून जामीन
Malkapur court sentenced accused to life imprisonment for sexually abusing minor girl and getting her pregnant
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादले ; आरोपीस जन्मठेप , डीएनए चाचणी निर्णायक
villagers rescue accused as well as cop falls into well In sangamner taluka
पुढे आरोपी, मागे पोलीस पाठलागाचा थरार ! आरोपी पाठोपाठ पोलीसही पडला विहिरीत
school girl and her brother molested by minors who threatened to kill her
जिवे मारण्याची धमकी देऊन शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य, अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल
pune builder punishment
पुणे : धनादेश न वटल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकास शिक्षा, सहा महिने कारावास आणि वीस लाख रुपयांचा दंड
pune session court latest marathi news
योगी आदित्यनाथ यांच्या सभेत गोंधळ घालणाऱ्या एकाचा जामीन फेटाळला, महिला पोलिसाला शिवीगाळ

काही आक्षेपर्ह माहिती या वेबसाईटवर आली की अज्ञात आरोपी पेजच्या माध्यमातून सदर आक्षेपर्ह पोस्टशी संबंधित विद्यार्थी यांना इंस्टाग्राम द्वारे संपर्क साधायचा. ही पोस्ट जाहिर न करण्यासाठी किंवा टाकलेली पोस्ट काढून घेण्यासाठी काही रकमेची मागणी केल्या जात होती. घाबरून गेलेले विद्यार्थी यांस बळी पडत. त्या पैकी काही मग आरोपीच्या मागे धावत. अज्ञात आरोपी धमकी पोटी मिळणारी रक्कम बिग बास्केट, फ्लिपकार्ट, मिशो, अश्या वेगवेगळ्या शॉपिंग साईट वर वस्तू बुक करीत होता. त्याची पेमेंट लिंक संबंधित विद्यार्थ्यांना पाठवून पेमेंट झाल्यावर सदर वस्तू आरोपीने दिलेल्या पत्त्यावर कंपनी पोहचवून देत असे. अश्या प्रकारे आरोपीने सावंगी येथीलच नव्हे तर याच संस्थेच्या नागपूर येथील दत्ता मेघे मेडिकल कॉलेजच्या असंख्य विद्यार्थ्यांवार जाळे टाकले.

हेही वाचा >>> यवतमाळ जिल्ह्यातील २४ मंडळांत अतिवृष्टी, संततधार सुरूच

वस्तू किंवा सेवा विकत घेण्यापोटी या आरोपीने मेडिकलच्या विद्यार्थ्यांची लुबाडणूक केली. ही एक प्रकारची खंडणी व विद्यार्थ्यांची कोंडी करणारी बाब ठरली. पोलीस तक्रार झाल्यावर तांत्रिक माहिती घेऊन शोध सूरू झाला. आरोपी दिल्ली येथील असल्याचे दिसून आले. पोलीस उपनिरीक्षक दिलीप नागपुरे तसेच हवालदार नीलेश कट्टोजवार, कुलदीप टाकसले, शुभांगी विघ्ने, शुभांगी महाजन यांचे पथक दिल्लीत धडकले. आरोपी दिल्ली येथील संगम विहार परिसरातील असल्याचे समजले. आरोपी असलेल्या महिलेने पेज तयार करीत वस्तू पाठवीत स्वतःचा आर्थिक लाभ करून घेतल्याचे स्पष्ट झाले. तिला अटक करीत न्यायालयात हजर करण्यात आल्यावर २५ तारखे पर्यंत पोलीस कोठडी  सुनावण्यात आली. पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर अधीक्षक डॉ. सागर कवडे, यांनी मार्गदर्शन केले. तसेच सायबर चमू व उपविभागीय अधिकारी प्रमोद मकेश्वर यांनी सहकार्य दिले.

Story img Loader