नागपूर : बायको सोडून गेल्यानंतर महापालिकेतील एका अधिकाऱ्याचा विवाहित असलेल्या शिक्षिकेवर जीव जडला. शिक्षिकेही दोन मुले आणि पतीसह सुरु असलेला संसार मोडून प्रियकरासोबत संसार थाटला. मात्र, काही वर्षांने अधिकाऱ्याची पत्नी न्यायालयाच्या आदेशाने घरी परतली. त्यामुळे तो अधिकारी पत्नी आणि प्रेयसीच्या कचाट्यात सापडला. मात्र, नाजूक आणि गुंतागुंत असलेल्या प्रकरणात भरोसा सेलने तोडगा काढून दिलासा मिळवून दिला.

विनोद हा महापालिकेत अधिकारी पदावर नोकरीवर आहे. त्याने नातेवाईक तरुणी दीक्षा हिच्याशी विवाह केल्यानंतर सुरळीत संसार सुरु होता. दाम्पत्याला एक मुलगी झाली. लग्नानंतर त्याला दारुचे व्यसन जडले. रोज दारु पिऊन येत असल्यामुळे पती-पत्नीत वाद आणि भांडण व्हायला लागली. पतीच्या रोजच्या वादाला कंटाळून दीक्षा मुलीसह माहेरी निघून गेली. पत्नी निघून गेल्यामुळे नैराश्यात गेलेल्या विनोद एकाकी पडला. यादरम्यान, त्याच्या कार्यालयाच्या शेजारी असलेल्या एका अंगनवाडीतील शिक्षिका शिल्पा (काल्पनिक नाव) हिच्याशी ओळख झाली. त्याने वारंवार अंगनवाडीत जाऊन शिल्पाशी संबंध वाढविले.

आणखी वाचा-सर्पसेवेसाठी दिव्यांगत्वावर मात

शिल्पा ही विवाहित असून तिला दोन मुले होती. विनोदने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. तिला लग्नाचे वचन दिले. त्यामुळे दीक्षाही त्याच्या प्रेमात अडकली. शिल्पाने दोन मुले आणि पतीसह सुरु असलेल्या सुरळीत संसारावर प्रेमासाठी पाणी सोडले. पतीशी चर्चा करून तिने विनोदसोबत राहण्याचा निर्णय घेतला. पत्नी माहेरी निघून गेल्यामुळे त्याने शिल्पाला थेट घरी आणले. आईवडिलांशी ओळख करुन दिली. दोघेही ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहायला लागले.

पत्नी आली नांदायला परत

मुलीच्या शाळेतील एका कार्यक्रमाला पालक म्हणून विनोदला बोलावण्यात आले. तेव्हा पुन्हा पत्नीशी गाठभेट झाली. दोघांमध्ये पुन्हा संबंध सुधारले. त्याने दारू सोडल्याचे सांगितल्यानंतर पत्नीने त्याला माफ केले. त्यानंतर तो पत्नीच्या घरी जायला लागला. पत्नीने घरी नांदायला परत येण्याचा निर्णय घेतला. पत्नी मुलीसह अचानक पतीच्या घरी परतली. तिला घरात शिल्पा दिसली. दोघींचा वाद झाला. कायदेशीर पत्नी असल्याचे सांगून दीक्षाने घरावर ताबा मिळवला.

आणखी वाचा-“आम्ही गोट्या खेळतो काय?” मंत्री चंद्रकांत पाटील का भडकले…

भरोसा सेलमध्ये पोहचली तक्रार

शिक्षिका असलेल्या शिल्पाने भरोसा सेलमध्ये तक्रार केली. पोलिसांनी तिघांनाही एकत्र बोलावले. पती-पत्नीने सोबत राहण्यासाठी सहमती दर्शविली. तर शिल्पाने एवढी वर्षे पत्नीप्रमाणे राहिल्यानंतर पत्नी म्हणून घरात ठेवावे, अशी भूमिका घेतली. पोलीस निरीक्षक सीमा सूर्वे आणि समूपदेशक समिधा इंगळे यांनी तिघांचीही समजूत घातली. कायदेशीर बाब समजून सांगण्यात आली. विनोदने शिल्पाला जीवनव्यापन करण्यासाठी मदत करण्याची तयारी दर्शविली. तिघांचेही समाधान झाल्यानंतर विनोद-दीक्षाचा संसार पुन्हा सुरळीत सुरु झाला.