लोकसत्ता टीम

बुलढाणा : महिलेने आपल्या दोन निरागस मुलासह तलावात उडी घेत सामूहिक आत्महत्या केल्याचे आज मंगळवारी, २७ ऑगस्ट रोजी उघडकीस आले. यामुळे मृताच्या गावासह खामगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

atul subhash
Atul Subhash Suicide Case : अतुल सुभाषच्या सासू आणि मेव्हण्याने केलं पलायन; पोलीस म्हणतात, “त्यांना नजरकैदेत…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
23 year old woman drowned her one year old son in water tank in Washind area of ​​Bhiwandi
जन्मदात्या आईकडूनच मुलाची हत्या
Atul Subhash Suicide Note last 12 wishesh
Atul Subhash Suicide: अतुल सुभाष यांच्या सुसाइड नोटमध्ये अनेक धक्कादायक दावे, शेवटच्या १२ इच्छा व्यक्त करताना न्यायव्यवस्थेवर केली टीका
Atul Subhash Suicide
Atul Subhash Suicide: गुन्हे मागे घेण्यासाठी ३ कोटी, तर मुलाला भेटू देण्यासाठी ३० लाख रुपयांची पत्नीकडून मागणी; अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी भावाचा खुलासा
soldier in Air Force committed suicide by shooting himself in head on duty
थरारक… वायुसेनेच्या जवानाची आत्महत्या, कर्तव्यावर तैनात असताना डोक्यात घातली गोळी अन्…
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप

खामगाव तालुक्यातील पिंप्री गवळी या गावात ही भीषण घटना घडली आहे. आज मंगळवारी ,२७ ऑगस्टला पिंप्री गवळी या गावातील पाझर तलावात एक महिला आणि दोन लहान मुला मुलीचे मृतदेह आढळून आले. महिलेच्या शरीराला (कंबरेला) दोरीने करकचून बांधलेली असल्याचे धक्कादायक बाब काही गावकऱ्यांनी जवळून पाहिल्यावर आढळून आले. पिंप्री गवळी येथील तलावात आढळून आलेले महिलेसह दोन चिमुकल्यांचे मृतदेह फुगलेले आणि पाण्यामुळे सडल्याचे दिसून आले. यामुळे गावकरी आणि पोलीस पाटील यांनी घटनेची माहिती खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याला दिली.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामीण पोलिसांचे एक पथक तात्काळ पिंप्री गवळी पाझर तलाव परिसरात दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळचा पंचनामा केला. पोलिसांनी काही जाणकारांच्या मदतीने एक महिला, तिचा मुलगा आणि तिची मुलगी असे तिघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले.

आणखी वाचा-‘पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात २०० कोटींची विकासकामे’

संसार मोडला अन्…

दरम्यान पोलिसांच्या पथकाने पिंप्री गवळी आणि परिसरात चौकशी केली. प्राथमिक तपासात मिळालेली माहिती अतिशय धक्कादायक आणि हृदयद्रावक होती. प्राथमिक तपासात मृत महिलेचे नाव पार्वती प्रकाश इंगळे (वय ३० वर्ष, हल्ली मुक्काम पिंप्री गवळी, तालुका खामगाव) असल्याचे निष्पन्न झाले. तिच्या मुलाचे नाव आर्यन इंगळे (वय ८ वर्ष राहणार पिंप्री गवळी)आणि मुलीचे नाव प्राची इंगळे ( वय ५ वर्ष , पिंप्री गवळी) आहे. या महिलेच्या कंबरेला दोन्ही मुले बांधलेले असल्याचे समोर आले असल्याने तिचा मुलांसह आत्महत्येचा निर्धार पक्का असल्याचा अंदाज आहे. अनेक वर्षानंतर संसार विस्कटल्यावर, दोघा मुलांना सोबत घेऊन काही दिवसांपासून ही महिला आपल्या पतीपासून माहेर गाव असलेल्या पिंप्री गवळी गावात राहत होती, असे चौकशीत बाहेर आले. मात्र तिने टोकाचा निर्णय का घेतला, स्वतःसह मुलांचाही अंत करण्याइतपत ती कठोर का झाली, तिने सामूहिक आत्महत्या का केली, याचा तपास आता खामगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत. या महिलेच्या सामूहिक आत्महत्येच्या मागील कारणांचा उलगडा सध्या तरी झाला नसल्याचे वृत्त आहे.

आणखी वाचा-चंद्रपूर: वादग्रस्त शिक्षणाधिकारी निलंबित

जिल्हा पुन्हा हादरला

मागील काही दिवसांत युवती, बालिकांवरील अत्याचार, लैंगिक छळाच्या घटनांनी जिजाऊंचे माहेर असलेला मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा हादरला आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील वर्दडी खुर्द येथील जिल्हा परिषद चिमुरड्या विद्यार्थ्यांनिंचा विकृत शिक्षकाने केलेला लैंगिक छळ, मोताळा तालुक्यातील पिंप्री गवळी येथील तेरा वर्षीय बलिकेचे अपहरण आणि तिच्यावर झालेला शारीरिक अत्याचारया घटनांनी जिल्हा हादरला आहे. समाज मन सुन्न झाले आहे. आता एका महिलेने असहाय स्थितीत आपल्या दोन मुलांसह केलेल्या सामूहिक आत्महत्याने बुलढाणा जिल्हा हादरला आहे.

Story img Loader