वाशीम : प्रदीर्घ विश्रांतीनंतर आज जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. दरम्यान, तालुक्यातील अनसिंग येथील नफिजा परवीन शेख रफीक (३०) यांचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला तर इतर ठिकाणी चार जनावरे दगावलीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बुधवारी रात्री जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली होती. गुरुवारी दुपारनंतर अचानक ढग दाटून आले आणि विजेच्या कडकडाटासह जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. या दरम्यान अनेक ठिकाणी विजेमुळे जीवितहानी झाली. वाशीम तालुक्यातील मौजे अनसिंग येथील नफिजा परवीन शेख रफिक यांच्या अंगावर वीज कोसळली. यात त्यांचा मृत्यू झाला. रिसोड तालुक्यातील मौजे नेतन्सा येथील तुकाराम विठोबा बाजड यांच्या शेतात असलेली गाय व म्हैस आणि मानोरा तालुक्यातील मौजे रुई येथील शेतकरी सुनील वैजनाथ जंगम यांचे मालकीचे दोन बैल विज पडून मृत पावले.