लोकसत्ता वार्ताहर

गोंदिया: मधमाशांच्या हल्ल्यानंतर एका महिलेचा गोंदिया येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान रविवारी मध्यरात्री मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी तिरोडा तालुक्यातील लोधीटोला शेतशिवारात घडली होती. कलाबाई कुंजीलाल बहेरवार (६०, रा. लोधीटोला) असे मृत महिलाचे नाव आहे.

कलाबाई बहेरवार हिच्या पतीचे निधन झाल्यामुळे ती भाऊ धोंडू लिखारे यांच्याकडे राहायची. दररोज भावाकडील गायी-म्हशी चारायला शेतशिवारात न्यायची. नेहमीप्रमाणे घटनेच्या दिवशी म्हणजे, शनिवारी तिने शहरालगत असलेल्या पारस नगरी परिसरातील शेतात गायी-म्हशी चारायला नेल्या होत्या. यावेळी त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना गोंदिया येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रविवारी रात्री तिचा मृत्यू झाला.

Story img Loader