धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्नाने एका महिलेचा जीव घेतला. खाद्यपदार्थ खरेदीसाठी ही गाडीतून उतरली होती आणि गाडी सुरू झाल्यावर चढण्यासाठी धावत सुटली. तोल गेल्याने ती फलाट आणि रेल्वे गाडी दरम्यान असलेल्या जागेत पडली. ही घटना नागपूर स्थानकावर
फलाट क्रमांक १ वर घडली. गायत्री पांडे (४५) रा. नालंदा, बिहार असे मृत महिलेचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>वर्धा : लाजराबुजरा साळींदर रस्त्यावर उतरला, अन्…

गायत्रीचे पती बेंगळुरूला स्टेट बँकेत व्यवस्थापक आहेत. त्यांना दोन मुली आहेत. मुलींसह त्या पतीला भेटण्यासाठी गेल्या होत्या. बेंगळुरू-दाणापूर हमसफर एक्स्प्रेसने परतीच्या प्रवासाला निघाल्या. बी-३ कोचमधून त्या प्रवास करीत होत्या. मंगळवारी सकाळी सव्वा दहा वाजताच्या सुमारास गाडी येथे आली. गाडी थांबताच प्रवासी उतरले. अनेक प्रवासी खाद्यपदार्थ, नास्ता, पाण्याची बाटली वगैरे घेऊन आपल्या बर्थवर बसले. मात्र, प्रवाशांच्या गर्दीत खाद्यपदार्थ घेण्यास गायत्रीला वेळ लागला. दरम्यान, गाडी सुटली. खाद्यपदार्थांसह त्या धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करीत होत्या. लोखंडी दांड्याला पकडून त्या गाडीत बसणार तोच त्यांच्या हाताची पकड सैल झाली. त्या थेट फलाट आणि रेल्वे गाडी याच्या मधातील जागेतून खाली घसरत गेल्या.फलाटावरील प्रवाशांनी आरडाओरड केली. काही वेळातच गाडी थांबली. आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिस घटनास्थळी पोहोचले. तिला बाहेर काढले. मात्र, प्रचंड रक्तस्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman dies while trying to board running train in nagpur rbt 74 amy