नागपूर : सायबर गुन्हेगाराने घरबसल्यास काम आणि गुंतवणूक केल्यास भरघोस परतावा देण्याचे आमिष एका महिलेला दाखवले. सुरुवातीला तिला दररोज एक हजार रुपये मिळायला लागले. त्यानंतर मात्र, सायबर गुन्हेगारांनी महिलेला जाळ्यात ओढून १६ लाख रुपयांनी फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा >>> परदेशी पाहुण्यांचे आगमन! गोंदिया जिल्ह्यातील धरण व तलावांवर स्थलांतरित पक्ष्यांच्या ५० हून अधिक प्रजातींचा चार महिने मुक्काम
अनंतनगर येथील रहिवासी फिर्यादी रचना गंधेवार (३४) ह्या गृहीनी आहेत. त्यांचे पती दुबईत इंजिनिअर आहेत. त्यामुळे त्यांची आर्थिक बाजू भक्कम आहे. रचना दुपारच्या सुमारास घरी असताना त्यांच्या मोबाईलवर आरोपीने लिंक पाठविली. त्यात पार्ट टाईम जॉबची ऑफर होती. घरबसल्या काम असल्याने रचना यांनी पुढील चौकशीसाठी ठकबाजाशी संपर्क साधला. त्याने कामाचे स्वरूप सागितले. प्रत्येक लाईक, सबस्क्राईबला पैसे मिळतील. त्यामुळे रचना यांनी काम स्वीकारले. कामाला सुरूवात झाली. सुरूवातीला त्यांना रक्कमही मिळाली. नंतर सायबर गुन्हेगाराने त्यांना टेलिग्राम ग्रुपवर जोडून घेतले. रक्कम गुंतविल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दिले. तसेच फिर्यादीच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती घेतली. फिर्यादीने काम सुरू केले. त्यांना ५० हजार, एक लाख असा ऑनलाईन नफा दिसत होता. शिवाय ग्रुप मधील सदस्यांच्या खात्यावरही लाभ दिसत होता. त्यामुळे महिलेला शंका घेण्याचे काही कारण नव्हते. मात्र, मिळालेला लाभ घेण्यासाठी आणखी रक्कम भरा, असा मॅसेज मिळत होता. असे करता करता आरोपीने १५ लाख ८४ हजार रुपये उकळून महिलेची आर्थिक फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून सारा प्रकार सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी आरोपी विरूध्द गुन्हा नोंदविला आहे.