गोंदिया : दुर्गम भागातून प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांसाठी डॉक्टरांचा हलगर्जीपणा कर्दनकाळ ठरत आहे. अशीच एक घटना मंगळवारी बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसुत महिलेचा मृत्यू नी उघडकीस आली. प्रतिभा मुकेश ऊके वय (३०) वर्षे राहणार सिग्नल टोली गोंदिया असे मृतक महिलेचे नाव आहे. येथील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय गोंदिया येथे प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांच्या जीवाशी खेळणारे डॉक्टर्सचा हलगर्जीपणाचा किती मोठा कळस गाठू शकतो याचे प्रत्यक्ष उदाहरण मृतक प्रतिभा मुकेश ऊके (३०) राहणार सिग्नल टोली गोंदिया असे मृतक महिलेचे नाव असून तिला शुक्रवार ११ एप्रिल पासून बाई गंगाबाई रुग्णालय गोंदिया येथे प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते.
प्रसूतीच्या कळा जाणवल्यानंतर तिला सोमवार १४ एप्रिल २०२५ रोजी तिच्यावर शस्त्रक्रिया करून तिने एका गोंडस बाळाला जन्म दिले. त्यानंतर मात्र गहजब झाल्या सारखे झाले सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार यादरम्यान कर्तव्यावर असणारे डॉक्टर हे प्रसूत महिलेच्या शस्त्रक्रिये दरम्यान अनुपस्थित होते. या शस्त्रक्रियेची माहिती त्यांच्या सहकारी ज्युनिअर डॉक्टरांनी वेळोवेळी देऊन त्यांना घटनास्थळी उपस्थित राहण्याची विनंती केली तरी सदर डॉक्टर हे वेळेवर उपस्थित राहू शकले नाही. त्या दरम्यान प्रस्तुत महिलेला अतिरक्तस्त्रावणे परिस्थिती अतिशय गंभीर बनली होती, जेव्हा ते (कर्तव्यदक्ष डॉक्टर) परतले तोपर्यंत वेळ निघून गेला होता. यावेळी सदर डॉक्टर हे आपल्या एका सहकार्यां सोबत विशिष्ट कामानिमित्त बाहेर असल्याच्या चर्चा परिसरात त्यांच्याच विभागाचे लोक करीत असल्याचे जाणवले. आणि अखेर त्या प्रसूत महिलेचा अतिरक्तस्त्रावणे मृत्यू झाला.
या बाबतची माहिती होताच यावेळी मृतकाच्या परिवारातील नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप करत रुग्णालयात गोंधळ घातल्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली होती.मंगळवारी सकाळच्या सुमारास घटनेची गंभीरता ओळखत येथील डॉक्टरांनी रुग्णालय परिसरात पोलिसांचा पहारा लावण्यात आला व परिस्थितीवर नियंत्रण करण्याचे कार्य केले गेले. दरम्यान मृतक महिलेला केटीएस सामान्य रुग्णालय गोंदिया येथे दाखल करण्यात आले.पोलिस बंदोबस्तात महिलेच्या मृतदेहावर शव विच्छेदन प्रक्रिया करण्यात आल्यानंतर मृतदेत कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.
प्रसुत महिलेचा बाळ गायब…?
प्रतिभा मुकेश उके या महिलेने सोमवार १४ एप्रिल २०२५ रोजी तिच्यावर शस्त्रक्रिया करून तिने एका गोंडस बाळाला जन्म दिले. त्यानंतर तिला अतिरक्तस्त्राव चा त्रास जाणवू लागला असल्याने तिला उपचारा करिता बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातून जवळील के. टी. एस. जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान बाळाला नवजात शिशु दक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. सदर महिलेवर के. टी. एस. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना तिच्या कुटुंबातील सदस्यांनी बाळाची विचारपूस गंगाबाई स्त्री रुग्णालयात केली असता त्यांना त्या नवजात बाळ बद्दल काहीच माहिती मिळाली नसल्याने गंगाबाई रुग्णालय प्रशासनाने बाळ कुठे गायब केलं यावरच बराच वेळ शोधा शोध सुरू होती. एक तासाच्या तपासणीनंतर सदर बाळ नवजात शिशु दक्षता कक्षात उपचार घेत असल्याचे कळल्याने कुटुंबियानी सुटकेचा श्वास घेतला.