वाघाच्या हल्ल्यात जाईबाई तुकाराम तोंडरे (६५) ही महिला ठार झाली. ही घटना आज गुरुवार ३ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली.ब्रह्मपुरी वन विभागांतर्गत येत असलेल्या नागभीड तालुक्यातील तोरगाव (बु.) या गावातील महिला जंगलात लाकडे आणण्यासाठी गेली होती. तिथेच वाघाने हल्ला केला. जिल्ह्यात मानव -वन्यजीव संघर्ष तीव्र झाला आहे. वन विभाग हा संघर्ष कमी व्हावा यासाठी काम करीत आहे. तरीसुद्धा संघर्ष कमी होण्यापेक्षा वाढत आहे. वाघाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे त्यांची नसबंदी करा किंवा स्थानांतरण करा, अशीही मागणी होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman killed in tiger attack amy