चंद्रपूर : मूल तालुक्यातील नांदगाव येथील वरातीची खासगी बस लग्न सोहळा आटोपून रात्री परत येताना खड्ड्यात कोसळली. त्यात सुनंदा हरिदास मडावी (५०) ही  महिला जागीच ठार तर २४ जण जखमी झाले. ही घटना  किन्ही- कोर्टी मार्गावर शुक्रवारी घडली. मुल तालुक्यातील नांदगाव येथील अनिल विलास मडावी या तरुणाचा विवाह सोहळा आटोपून वरात परत येत असताना ट्रॅव्हल्स खड्ड्यात कोसळली. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> वाशीम : चिमुकल्या अक्षराचा आगळावेगळा छंद; १००० वृक्षांच्या बिजांचे केले संकलन !

नांदगाव येथील विलास मडावी यांच्या मुलाचा विवाह बल्लारपूर येथे शुक्रवार १२ मे रोजी झाला. विवाह सोहळा आटोपून नांदगावला परत येत असताना (मानोरा) किन्ही- कोर्टी मार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स  खड्ड्यात कोसळली. ही घटना रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच नांदगाव येथील माजी सरपंच मंगेश मगनुरवार व नीलेश मगनुरवार या बंधूंनी जखमींना रुग्णालयात नेण्यास मदत केली. जखमींना मुल, बल्लारपूर, चंद्रपूर येथील रुग्णालयात  दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.