नागपूर : समृद्धी महामार्गावर एका ३० ते ३५ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्यानंतर गळा चिरून खून करण्यात आला. ही घटना मंगळवारी दुपारी दोन वाजता उघडकीस आली. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुमगाव-वडगाव मार्गावरून शेतात काही मजूर जात होते. त्यांना आष्टनकर-मातीखाये यांच्या शेतात एक महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. महिलेचे कपडे अस्तव्यस्त होते तर तिचा गळा धारदार शस्त्राने चिरलेला होता. या घटनेची माहिती शेतमजुरांनी हिंगणा पोलिसांना दिली.

हेही वाचा >>> नागपूर: विवाहितेवर बलात्कार करून खंडणीची मागणी

Woman Raped By Mantrik in Mumbai
Mumbai Crime : महिलेवर बलात्कार करुन दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मांत्रिकाला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Case registered against school cashier for embezzling Rs 16 lakh Pune news
शाळेतील रोखपाल महिलेकडून १६ लाखांचा अपहार; लोणी काळभोर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Nagpur murder news
गृहमंत्र्यांच्या शहरात हत्याकांडाची मालिका! चौघांनी मित्राचा खून करुन मृतदेह रस्त्यावर फेकला…
Kondhwa police station, women police beaten ,
कोंढवा पोलीस ठाण्यात गोंधळ घालून महिला पोलिसांना धक्काबुक्की
Rape of a woman, lure of marriage, Pune, fraud,
पुणे : विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलत्कार, आरोपीकडून अधिकारी असल्याची बतावणी; ३८ लाखांची फसवणूक
misunderstanding of kidnapping because of girl scream in car
कारमध्ये आरडाओरड करणे आले अंगलट, काय घडले?
Unnatural sexual assault with female lawyer by husband family and in laws
महिला वकिलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार… न्यायाधीश असलेला सासराही…

जवळपास तासाभराने हिंगण्याचे ठाणेदार विशाल काळे हे घटनास्थळावर पोहचले. पंचनामा केला असता महिलेच्या गळ्यावर शस्त्राचे अनेक वार होते. तर मृत महिलेवर अतिप्रसंग झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस उपायुक्त आयपीएस अर्चित चांडक यांनी लगेच घटनास्थळाला भेट दिली. तपासाची दिशा ठरवून दिली. तसेच आजूबाजूच्या गावात मृत महिलेचे छायाचित्र दाखवून ओळख पटवण्याचे कार्य सुरू केले. ही महिला मध्यम कुटुंबीयातील असून प्रेमप्रकरण किंवा अनैतिक संबंधाची या हत्याकांडाला किनार आहे. हिंगणा पोलिसांचा वचक नसल्यामुळे या परिसरात अनेक अवैध धंद्यांना ऊत आला आहे. परंतु, तपास पथकाचे कर्मचारी वसुलीत मग्न असतात. त्यामुळे हिंगणा परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांचा वावर जास्त वाढला आहे. या हत्याकांडातही सामूहिक बलात्कार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या महिलेचा कुठेतरी खून करून समृद्धी महामार्गालगत मृतदेह फेकल्याची चर्चा आहे. याप्रकरणी हिंगणा पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Story img Loader