यवतमाळ : पांढरकवडा तालुक्यातील पहापळ येथे एका महिलेला कामावर घेवून जाताना सामूहिक लैंगिक अत्याचार करून तिला विष पाजून ठार मारण्यात आले होते. १५ दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेप्रकरणी अखेर पांढरकवडा पोलिसांनी सोमवार, १० जुलै रोजी खुनासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून दोघांना अटक केली. अण्णाराव भीमा धोत्रे (७३) व रामकिसन राजा शिंदे (५५) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत, तर रत्नमाला (३५) असे मृत महिलेचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पहापळ येथील अण्णाराव धोत्रे व रामकिसन शिंदे या दोघांनी २३ जून रोजी सकाळी रत्नमालाला कामावर नेण्याच्या बहाण्याने सोबत नेले. दुपारी तिला घरी आणून सोडले. पुन्हा सायंकाळी तिला सोबत नेले. रात्री या नराधमांनी तिला दारू पाजून पहाटे ४.३० वाजेपर्यंत तिच्यावर पाशवी अत्याचार केला. त्यानंतर तिला विषारी औषध पाजले. बेशुद्ध अवस्थेत तिला घरी नेऊन सोडण्यात आले. मात्र शरीरात विष गेल्याने ती तडफडत असल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आल्याने तिला पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्याने यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. २६ जून रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी सखोल तपास करून सोमवारी अण्णाराव धोत्रे व रामकिसन शिंदे या दोघांनाही अटक केली. या घटनेने पांढरकवडा तालुक्यात खळबळ उडाली असून विविध सामाजिक संघटनांनी आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.