राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या वातावरण निर्मितीसाठी शहर महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी संविधान चौक ते सेंट्रल ॲव्हेन्यूवरील महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत दुचाकी मिरवणूक काढली.राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा विदर्भात १५ नोव्हेंबरला येत आहे. त्यासाठी संपूर्ण विदर्भात विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात येत आहे. या यात्रेचा प्रचार केला जात आहे. संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नॅश अली यांच्या नेतृत्वाखाली ही बाईक रॅली निघाली. त्यानंतर सेंट्रल ॲव्हेन्यू येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून दुचाकी मिरवणुकीचा सांगता करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>>जाचक अटींमुळे शेतकरी त्रस्त ; शासकीय योजनेचे लाभार्थी अतिवृष्टीबाधितांच्या मदतीस अपात्र

या काँग्रेस नेत्या डॉ. चित्रा तूर आणि माजी नगरसेविका रजनी बरडे यांनी हिरवा झेंडा दाखवून मिरणुकीचा प्रारंभ केला. या मिरवणुकीत महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस कांता पराते, आशा राऊत, पुनम कामडी, उषा धुर्वे, नंदा अतकरे, विजया धोटे, पार्वती राठोड, रिचा जैन, सुजाता कोंबाडे, रोजीना शेख, सुरेखा लोंढे यांच्यासह अनेक कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.