विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांचा राजकीय आणि सामाजिक प्रवास जवळून पाहणाऱ्यांना मोठाच धक्का बसला आहे.   गोऱ्हेंच्या सेना प्रवेशावर सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने म्हणाल्या, निलम गोऱ्हे यांना मी पुरोगामी, प्रगतीशिल विचाराची महिला म्हणून बघितले आहे. त्यांनी युवक क्रांती दल म्हणजेच युक्रांदच्या माध्यमातून महिलांच्या प्रश्नावर काम केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान…!

कामगार, मजूर, शोषित यांच्याप्रमाणेच स्त्री मुक्तीसाठी त्या काम करत होत्या. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. भारिपच्या तिकिटावर त्यांनी विधानसभेची निवडणूकही लढवली होती. पुढे त्यांनी काही काळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केले आणि मग शिवसेनेत प्रवेश केला. येथेपर्यंत ठीक होते. पण, शिंदेंच्या गोटात सामील होणे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच विचार स्वीकारणे होते. निलम गोऱ्हे यांची वैेचारिक बैठक आणि केंद्रातील मोदी सरकारची वैचारिक बैठक आतापर्यंत तरी कुठेच मेळ खात नव्हती. त्यामुळे त्यांच्या पक्षांतराने धक्का बसला आहे, असेही सबाने म्हणाल्या.