लोकसत्ता टीम

नागपूर : पत्नी व दोन मुलांसह भाड्याने राहणाऱ्या युवकाचे घरमालकाच्या दहावीत शिकणाऱ्या मुलीसोबत सूत जुळले. मुलीच्या अजानतेपणाचा गैरफायदा घेऊन त्या युवकाने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यादरम्यान, युवकाने त्या मुलीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले. ते फोटो बायकोच्या हातात लागल्यानंतर तिने सोशल मीडियावर व्हायरल केले. याप्रकरणी पोलिसांनी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली. दिनू सहारे (४५) असे आरोपीचे नाव आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनू सहारे हा खासगी वाहनांवर चालक आहे. त्याला पत्नी व दोन मुले आहेत. गेल्या ५ वर्षांपासून तो शहर पोलिसांच्या हद्दीत ग्रामीण भागात भाड्याने राहतो. त्याचा स्वभाव चांगला असल्यामुळे त्याचे घरमालकाशी चांगले संबंध निर्माण झाले. त्यावेळी घरमालकाची १२ वर्षांची मुलगी प्राजक्ता (बदललेले नाव) नेहमी दिनूच्या घरी खेळायला येत होती. तेव्हापासूनच दिनूची तिच्यावर वाईट नजर होती. तिला नेहमी चॉकलेट देणे, शाळेत सोडून देणे किंवा तिला बाईकवर बसून फिरायला नेणे असे काम तो करीत होता. त्यामुळे प्राजक्तासुद्धा त्याच्याकडे आकर्षित झाली.

मुलगी दहावीत असताना दिनूच्याच घरी ती अभ्यासाला येत होती. तेव्हापासून त्याने तिच्याशी अश्लील चाळे करणे सुरु केले. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवले. भविष्यात लग्न करणार या आशेने ती मुलगी त्याच्यावर विश्वास ठेवून होती. गेल्या दोन वर्षांपासून दोघांचे प्रेमप्रकरण सुरु होते. घरमालकाचा विश्वास संपादन केल्यामुळे तो प्राजक्ताला केव्हाही घरी बोलावत होता. या प्रकाराकडे दिनूची पत्नी आणि घरमालकांनी कधीच संशयाने बघितले नाही. याचा गैरफायदा घेऊन दिनू तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत होता.

पत्नीला मोबाईलमध्ये सापडले अश्लील फोटो

दिनू हा प्राजक्ताला नेहमी ग्रामीण भागातील ओयो हॉटेलमध्ये नेत होता. ऑक्टोबर महिन्यात त्याने एका हॉटेलमध्ये नेले. दोघांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यादरम्यान दिनूने प्राजक्ताचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले. मार्च महिन्यात दिनू आंघोळीला गेला असता त्याचा मोबाईल बायकोने घेतला. त्यात नवऱ्यासोबत प्राजक्ताचे शारीरिक संबंधाचे व्हिडिओ दिसले. तिने ते सर्व फोटो आणि व्हिडिओ प्राजक्ताच्या वडिलांच्या मोबाईलवर पाठवले आणि कुटुंबियांनासुद्धा पाठवले. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला.

पोलिसांनी केला गुन्हा दाखल

वडिलांनी प्राजक्ताला फोटो आणि व्हिडिओ दाखवून विचारणा केली. तसेच दिनूलाही बोलावून घेतले दोघांनीही प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली. मात्र, प्राजक्ता अल्पवयीन असल्यामुळे तिच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांकडे प्राजक्ताने प्रेमसंबंध असल्याची आणि बारावी पास झाल्यानंतर लग्न करणार होतो, अशी कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन प्रियकर दिनूला अटक केली.

Story img Loader