अमरावती : चुलत सासऱ्यानेच सुनेवर अतिप्रसंग केल्‍याची धक्‍कादायक घटना आसेगाव पूर्णा ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी पीडित सुनेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी चुलत सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मंगळवारी ८ ऑगस्ट रोजी सकाळी पीडित २० वर्षीय विवाहिता व तिचे आजेसासरे हे दोघेच घरी होते. त्यावेळी आरोपी ३९ वर्षीय चुलत सासरा त्यांच्या घरी पोहोचला. घरी कुणीच नाही का, अशी विचारणा त्याने सुनेला केली. त्यावर आजेसासरे आहेत, बाकी सर्व शेतात गेले, असे सुनेने त्याला सांगितले. त्याचवेळी चुलत सासऱ्याने सुनेवर दोन वेळा अतिप्रसंग केला. या प्रकाराची वाच्यता केल्यास तुला व तुझ्या सासऱ्यांना मारून टाकेन, अशी धमकीही त्याने दिली. तेवढ्यात पीडितेचा पती घरी आल्याने आरोपी चुलत सासरा तेथून निघून गेला.

crime Uttar pradesh
क्रूरतेची परिसीमा! तरुणीवर बलात्कार करून निर्घृण हत्या, डोळेही काढले; कुटुंबीयांचा पोलिसांवर गंभीर आरोप!
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Amravati , Murder , immoral relationship,
अमरावती : अनैतिक संबंधातून हत्‍या, अपघाताचा बनाव
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Santosh Deshmukh Brother Dhananjay Deshmukh
Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुख यांचा मोठा खुलासा, “त्यादिवशी आरोपी आणि एपीआयचं चहाचं बिल मीच दिलं, त्यानंतर त्याने…”
Crime News In Marathi
Crime News : आतडे फाडले अन् हवेत… आईच्या प्रियकराची भावंडांकडून क्रूर हत्या
yamuna revier
यमुनेच्या पाण्यावरून वादाचे तरंग; केजरीवाल यांच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल

हेही वाचा – नागपूर : ६५ वर्षीय नाराधमाचा १६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, पीडिता बनली कुमारी माता

हेही वाचा – वर्धा : बनावट शासकीय प्रमाणपत्रांचा गोरखधंदा, अमरावतीच्या आरोपीस पत्नीसह अटक

त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा चुलत सासरा हा लैंगिक शोषण करण्याच्या उद्देशाने पीडित सुनेच्या घरी गेला. मात्र, घरी तिच्या पतीला पाहून तो आल्यापावली पळून गेला. या प्रकरणी पीडितेने आसेगाव पूर्णा ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी चुलत सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Story img Loader