अनिल कांबळे, लोकसत्ता
नागपूर : कला, नाट्य, संगीत आणि साहित्य क्षेत्रात काम करीत असताना नागपुरातील तरुणी कोलकाताच्या तरुणाच्या प्रेमात पडली. त्याने प्रेमासाठी आई-वडील, घर सोडून प्रेमविवाह केला आणि पत्नीचे शिक्षण पूर्ण केले. ती नोकरीवर लागताच तिने घटस्फोट देण्याची तयारी केली. मात्र, भरोसा सेलने दोघांचेही समुपदेशन करीत तुटण्याच्या काठावर असलेला संसार वाचविला.
देवदत्त आणि रिमा (बदललेले नाव) हे दोघेही कला, नाट्य, संगीत आणि साहित्य क्षेत्रात सक्रीय होते. देवदत्त हा पश्चिम बंगाल-कोलकातामधील रहिवासी होता. त्याने संगीत क्षेत्रात नाव कमावले होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने रिमाची नागपुरात भेट झाली. दोघेही गीत-संगीत कार्यक्रमाच्या निमित्ताने संपर्कात होते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. रिमाने सासरी जाण्याऐवजी वृद्ध आईच्या सेवेसाठी देवदत्त यालाच नागपुरात राहण्याची अट ठेवली. त्याने प्रेमापोटी अट मान्य करीत प्रेमविवाह केला.
आणखी वाचा-नागपूर : प्रियकर-प्रेयसी लग्न करण्यासाठी बनले एटीएम चोर
लग्नानंतर काही दिवस हालाखीत जीवन कंठले. त्यानंतर देवदत्त हा शाळेत संगीत शिक्षक म्हणून कामाला लागला. त्याने पत्नी रिमालाही शिक्षण पूर्ण करण्यासाठी सज्ज केले. तिनेही पतीला सकारात्मकता दाखवत पदवीला प्रवेश घेतला. त्यानंतर तिने पीएचडीसुद्धा केली. दोघांचाही सुखी संसार सुरु असताना त्यांना एक मुलगी झाली. त्यानंतर तिला प्राध्यापक पदावर नोकरी लागली. त्यानंतर मात्र, रिमाच्या स्वभावात फरक पडला. ती पतीला कमी लेखायला लागली आणि पतीचा वारंवार अपमान करीत होती. त्यामुळे संसारात खटके उडायला लागले.
‘लाईफस्टाईल’सह वागणूकही बदलली
गलेलठ्ठ पगारासमोर पतीचा मात्र तुटपुंज्या पगारामुळे ती पतीला टोमणे मारत होती. तिच्या जीवनशैलीत बदल झाला आणि ती किट्टी पार्टी, सिनेमा, महिलांच्या बैठका, कार्यक्रम-समारंभात वावरत होती. तिला साध्याभोळ्या पतीचा कंटाळा आला होता. त्यामुळे तिला साथ देणारा मित्र हवा होता. त्यामुळे तिने पतीपासून घटस्फोट घेण्याचा विचार केला. दुसरीकडे मात्र देवदत्त हा पत्नीच्या निर्णयामुळे खचून गेला.
आणखी वाचा-विदर्भात दोन दिवस हलक्या सरी ?
समुपदेशन आणि संसार तरला
पत्नीच्या निर्णयामुळे दुःखी झालेल्या देवदत्तने भरोसा सेलमध्ये धाव घेतली. पोलीस निरीक्षक सीमा सुर्वे यांनी बाजू ऐकून घेतली. समुपदेशक पाटील यांनी दोघांना भरोसा सेलमध्ये बोलावले. गरीबीत काढलेले दिवस आणि शिक्षणासाठी दिलेल्या प्रोत्साहनाची रिमाला आठवण करून दिली. पतीने केलेला आईवडिल, नातेगोते आणि घराचा त्याग लक्षात आणून दिला. दोघांची समजूत घातली. मुलीनेही आईशी चर्चा करून उर्वरित आयुष्यात वडिलांची साथ महत्वाची असल्याचे सांगितले. त्यामुळे तुटण्याच्या काठावर असलेला संसार वाचला.