नागपूर: नागपूर ते नवी दिल्ली रेल्वे मार्गावर जरीपटका येथे उभारण्यात येत असलेल्या उड्डाण पुलामुळे येथील नझुल वसाहतीमधील नागरिकांसमोर अडचणीचे डोंगर उभे झाले आहेत. पुलाचे काम थांबवून संरचनेत बदल करण्याच्या मागणीसाठी स्थानिक महिलांनी बुधवारी जरिपटका येथे आंदोलन केले. पुलाचे बांधकाम सुरू आहे. हे अतिशय संथ गतीने सुरू आहे. शिवाय या पुलामुळे नझुल वसाहतीमधील नागरिकांना मुख्य रस्त्यावर ये-जा करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर देखील ही समस्या कायम राहणार आहे. त्यामुळे जरीपटका दलित कल्याण महिला मंडळाने त्याविरोधात आंदोलन केले.

हेही वाचा >>> अकोला : बच्चू कडू व रवि राणामध्ये हिश्श्यावरून वाद, नाना पटोलेंची टीका; म्हणाले, “सत्तेमधील आमदार ५० खोक्यांसाठी तर…”

 जरीपटका रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम रेल्वे खात्याने १९२३ मध्ये केले होते. तो रेल्वेच्या हद्दीत असून जीर्ण झाल्यामुळे ते पाडून त्या ठिकाणी नवीन आरओबी बांधण्यात येत आहे. या पुलाचे डिझाईन नझुल वस्तीसाठी अडचणीचे आहे. म्हणून पुलाच्या संरचनेत बदल करण्याची स्थानिकांची मागणी आहे. मेकोसाबाग ते सीएमपीडीआय बाजूचे बांधकाम त्वरित थांबण्यात यावे. हर्षवर्धन बुद्ध विहार समोरील मुख्य रस्त्याला भुयारी मार्ग (अंडर पास) देण्यात यावे आणि रेल्वे उड्डाण पूल जरिपटका येथील जिंजर मॉलजवळ उतरवण्यात यावा, अशी मागणी जरीपटका दलित कल्याण महिला मंडळाने केली आहे.

Story img Loader