यवतमाळ : येथे आज आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती आणि महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू होताच काही महिलांनी गोंधळ घातल्याने सुरक्षा यंत्रणांची तारांबळ उडाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कार्यक्रमाच्या ऐन वेळेवर मुसळधार पाऊस कोसळल्याने कार्यक्रमस्थळी बराच गोंधळ उडाला. आज विरोधी पक्षांनी मूक निषेध मोर्चा काढला. त्यातच बांग्लादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीनेही मूक मोर्चाचे आयोजन शहरात करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमस्थळी नागरिकांसह निमंत्रितांना सर्व खातरजमा करून, सुरक्षा पास बघूनच प्रवेश दिला जात होता. ऐनवेळी जोरदार पाऊस झाल्याने सर्वत्र गोंधळ उडाला. त्यामुळे बाहेरगावाहून आलेल्या महिलांनी मंडपात गर्दी केली.
हेही वाचा…रा. स्व. संघाशी संबंधित कंत्राटी कामगार संघटनेचा नागपुरात ठिय्या….मागण्या पूर्ण होईस्तोवर….
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी आगमन होताच मंडपात उभारलेल्या रॅम्पवरून महिलांना अभिवादन करत प्रवेश केला. यावेळी प्रशासनाने परवानगी दिलेल्या मोजक्या महिलांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना राखी बांधली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महिलांशी संवाद साधत लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झाले का, अशी विचारणाही केली. त्यानंतर मुख्यमंत्री भाषणासाठी उभे राहिले तेव्हा त्यांच्या उजव्या बाजूच्या मंडपातील काही महिलांनी जोरजोराने ओरडत गोंधळ घातला. मुख्यमंत्र्यांनी भाषण थांबवत त्यांना आपल्याकडे येऊ द्या. त्यांची काय तक्रार आहे, हे जाणून घेऊ द्या, अशी सूचना सुरक्षा यंत्रणेस केली. त्यानंतर ते पुन्हा बोलत असताना महिला नारे देत असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी पालकमंत्री संजय राठोड यांना सूचना करून त्या महिलांना बाहेर घेऊन येण्याची सूचना केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरळीत झाले. पालकमंत्री संजय राठोड व पोलीस अधिकाऱ्यांनी महिलांजवळ पोहचून त्यांची तक्रार जाणून घेतली. संजय राठोड यांनी एक चिठ्ठी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवली. तेव्हा त्या महिला दिग्रस तालुक्यातील आनंदवाडी पारधी बेड्यावरील असल्याचे आणि त्यांची पोलिसांबाबत काही तक्रार असल्याचे समोर आले. या महिलांना त्रास देणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी भाषणातून दिली. त्यानंतर महिला शांत झाल्या.
हेही वाचा…“शरद पवार, उद्धव ठाकरेंना त्यांचे राजकारण लखलाभ…”, बदलापूरच्या घटनेवरून चंद्रशेखर बावनकुळेंकडून….
मुख्यमंत्र्यांनी सर्व महिलांना पैसे खात्यात आले की नाही, हे हात उंचावून सांगण्याचे आवाहन केले तेव्हा संपूर्ण सभागृहातील महिलांना हात उंचावून समर्थन दिले. ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील त्यांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा होईल आणि सप्टेंबर महिन्यात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यांचे पैसे जमा होतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.