नागपूर : नागपुरातील लाकडी बैलांच्या (तान्हा) पोळ्याला २१७ वर्षे पूर्ण होत आहेत. महाराष्ट्रात सर्वत्र पोळा हा बैलांचा सण म्हणून साजरा होतो. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तान्हा पोळ्याला शहरातील अनेक भागात लहान मुले लाकडी बैलांचा पोळा भरवतात. विदर्भ वगळता कुठेच हा पोळा साजरा होत नाही. सन १८०६ मध्ये दुसरे श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले यांनी लहान मुलांना बैलांचे महत्व कळावे म्हणून हा उत्सव सुरु केला. राजे रघुजी महाराज भोंसले यांनी लाकडी बैल तयार करून सर्व लहान मुलांना वाटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> शरद पवार यांनी आरक्षणावर बोलू नये; बावनकुळे असे का म्हणाले…

जिवंत बैलांप्रमाणे त्या बैलांना सजविण्यात आले. आंब्याचे तोरण लावून जिलेबी, फळे, चॉकलेट, बिस्कीट पुडे अशा विविध वस्तू तेथे बांधण्यात आल्या. बैलाजवळ मुलांना उभे करून बैलांची पूजा केली जायची. पूजा संपल्यानंतर तोरण तोडून पोळा फोडून वाजत गाजत हनुमान खिडकीचे दर्शन घेऊन हनुमानाला नारळ फोडून परत आल्यावर मुलांना खाऊ, पैसे, वाटले यायचे. आता या प्रथेला २१७ वर्षे पूर्ण होत आहेत. राजे मुधोजी महाराज भोंसले यांनी ही प्रथा आजही कायम ठेवली. त्यांच्या वाड्यात सर्वात मोठा लाकडी बैल आहे. सीनियर भोसला पॅलेस, महाल, नागपूर येथे हा बैल आजही बघता येतो. या लाकडी बैलांची उंची आठ फूट, लांबी सहा फूट असून या बैलांच्या पायात चांदीचा तोडा घातला आहे. ज्या पद्धतीने श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले वाजत गाजत मिरवणूक काढायचे त्याच परंपरेला अनुसरून दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या प्रमाणात मिरवणूक निघेल. आजही प्रथा सुरू असल्याची माहिती रघुजी महाराज भोसले यांचे प्रसिद्धीप्रमुख सारंग ढोक यांनी दिली.