लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
यवतमाळ : येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयातील बत्ती गुल झाल्याने कामकाज ठप्प पडले. त्यामुळे संतप्त नागरिकांनी शुक्रवारी या कार्यालयास कुलूप ठोकले.
जराही वीजपुरवठा खंडीत झाल्यास येथील सेवा ठप्प होते. शुक्रवारी वीजपुरवठा बंद असल्याने सकाळी १० वाजापासून दुपारी उशिरापर्यंत कामकाज ठप्प होते. त्यामुळे संतप्त होत बळीराजा पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष दडांजे यांनी कार्यालयाच्या प्रवेशदाराला कुलूप ठोकले.
आणखी वाचा-‘होऊ द्या चर्चा’…” भाजप सरकार स्वतःची टिमकी वाजविण्यातच पुढे,” ठाकरे गटाचे नेते बरसले; म्हणाले…
उपप्रादेशिक परिवन विभागाच्या कार्यालयात कामानिमित्त नागरिक आले होते. वीजपुरवठा बंद असल्याने कामकाज ठप्प होते. बराच वेळ प्रतीक्षा करून कामकाज सुरू झाले नाही. जनरेटर असून, ते नादुरुस्त असल्याचा आरोप करीत कार्यालयाला काही वेळासाठी कुलूप ठोकण्यात आले. सेवा सुरू होण्याच्या प्रतीक्षेत कार्यालयाबाहेर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. वरिष्ठांनी कार्यालयाच्या कारभारात सुधारणा करावी, अशी मागणी संतोष दडांजे यांच्यासह नागरिकांनी केली.
यवतमाळ शहरातील वीजपुरवठा खंडित असल्याने कार्यालयात वीज नव्हती. मात्र कामकाज ठप्प नाही झाले. जनरेटर देखील सुरू आहे. कार्यालयाला स्वतंत्र फिडर देण्यासंदर्भात पत्रव्यवहारदेखील करण्यात आला असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी स्पष्ट केले.