नागपूर : मराठी पदार्थ सातासमुद्रापार नेणारे बल्लवाचार्य, शेफ विष्णू मनोहर दिवाळीच्या आधी सहा हजार किलोच्या कढईत १६ ऑक्टोबरला जागतिक खाद्यान्न दिनी दोन हजार किलो चिवडा तयार करणार आहेत.रामदासपेठ येथील विष्णूजी की रसोई येथे सकाळी ९ ते ११ या वेळेत चिवडा तयार करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : विश्लेषण : ‘आदिपुरुष’वर खरंच बंदी घातली जाऊ शकते का? सेन्सॉर बोर्डचे नियम जाणून घ्या

हेही वाचा : चीनला ‘जशास तसे’ उत्तर का नाही ?

विशेष म्हणजेए हा चिवडा गडचिरोली, मेळघाट येथील दुर्गम भागातील लोकांसाठी पाठवणार आहेत.दिवाळी म्हटली की लाडू, चकल्या आणि शेवचिवड्याशिवाय होत नाही.त्यातही चिवडा आवडता असतो. चिवडा केवळ दिवाळीतच नाही. तर वर्षभर घरोघरी होतो. म्हणून दिवाळी आणि जागतिक खाद्यान्न दिवसाचे निमित्त साधून चिवडा तयार करण्यात येणार आहे. या चिवड्यासाठी मध्यप्रदेशातील उज्जैन येथून ६०० किलो चिवडी आणली. या चिवड्यात बदाम, काजूही असणार आहे.

हेही वाचा : १३ पेक्षा अधिक नागरिकांचा बळी घेणारा ‘टायगर’ अखेर जेरबंद

या चिवड्यासाठी शेंगदाणा तेल ३५० किलो, शेेंगदाणे १०० किलो, काजू व किसमिस १००, डाळवा व खोबरे प्रत्येकी ५०, हिंग व जीरे पावडर प्रत्येकी १५ किलो, मिरची पावडर ४० किलो, कढीपत्ता व सांभार प्रत्येकी १०० किलो, वाळलेले कांदे ५० किलो, धने पावडर ४० किलो लागणार आहे.एका मोठ्या कढईमध्ये हा चिवडा तयार करणार असून त्यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची जमवाजमव सुरू आहे. चिवडा तयार करण्यात आल्यानंतर कांचन नितीन गडकरी आणि अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या चिवड्याचे मोफत वितरण करण्यात येणार असल्याची माहिती विष्णू मनोहर यांनी दिली.