लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : उपराजधानीतील हृदयरोग तज्ज्ञांकडे उपचारासाठी आलेल्या एकूण रुग्णांपैकी ४० टक्के रुग्णांमध्ये उच्च रक्तदाबाचे नव्याने निदान झाले आहे. १७ मे रोजी जागतिक उच्च रक्तदाब दिवस असून त्यानिमित्त घेतलेला हा आढावा.

या रुग्णांना उच्च रक्तदाबाबाबत माहितीच नसते. हृदयविकाराचा झटका आलेल्यांपैकी सुमारे ६० टक्के रुग्णांना उच्च रक्तदाब असतो. त्यामुळे उच्च रक्तदाबग्रस्तांना हृदयविकाराची जोखीम अधिक असल्याची माहिती हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अमेय बिडकर यांनी दिली.

आणखी वाचा-नागपूर : अल्पवयीन भाचीसह १८ वर्षाच्या मावशीवर बलात्कार, पीडितेची प्रकृती बिघडल्यामुळे उलगडा…

हल्ली जीवनशैलीमध्ये प्रचंड बदल झाला आहे. ताणतणावाच्या जीवनशैलीमुळे कमी वयातच उच्च रक्तदाबाची समस्या वाढत आहे. उच्च रक्तदाब विकाराने ग्रस्त एकूण रुग्णांपैकी २० टक्के रुग्णांना मधुमेह असतो. त्यामुळे विकारांचे दुष्टचक्रच सुरू होते. तरुणांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढले आहे. रक्तदाब दीर्घकाळ नियंत्रणात नसेल तर शरीरातील विविध अवयवांना हानी पोहचते. ३० टक्के रुग्णांना वाढलेल्या वाईट कोलेस्ट्रॉल, २५ टक्के रुग्णांना युरिक ॲसिड आणि ३५ ते ४० टक्के रुग्णांना लठ्ठपणाचा त्रास असतो.

रक्तदाब हा जीवनशैलीशी निगडित आहे. त्यामुळे तणावमुक्त व संतुलित जीवनशैली हा उपचाराचा पहिला टप्पा आहे. आहारातून फॅटयुक्त, फास्ट व जंकफूड, अधिक मीठ असलेले पदार्थ टाळावे. वरून मीठ घेणे टाळावे. नियमित व्यायाम करावा. जीवनशैलीतील बदल देखील अत्यंत आवश्यक आहे.

आणखी वाचा- उदरनिर्वाहासाठी ‘ती’ तेंदूपत्ता तोडायला गेली….पण, बिबट्या काळ बनून आला आणि…

महत्वाचे..

हल्ली जीवनशैलीमध्ये प्रचंड बदल झाला आहे. ताणतणाव युक्त जीवनशैलीमुळे कमी वयातच उच्चरक्तदाब विकाराचे रुग्ण हृदयरोगतज्ज्ञ पर्यंत पोहचत आहे. आणि उच्चरक्तदाब विकाराने ग्रस्त असलेल्या एकूण रुग्णांपैकी २० टक्के रुग्णांना मधूमेह असतो तसेच अन्य विकारही ग्रासण्याची शक्यता वाढते. त्यामुळे विकारांचे दुष्टचक्र सुरू होते. हा प्रकार टाळण्यासाठी उच्च रक्तदाबाचे वेळीच निदान व त्यावर उपाय आवश्यक आहे.

“उच्च रक्तदाबग्रस्त व्यक्तींना हृदयविकाराची जोखीम असते. मात्र, रक्तदाब नियंत्रणात ठेवला तर गुंतागुंत टळू शकते. त्यासाठी वर्षातून किमान एकदा स्वतःचा रक्तदाब मोजावा.” -डॉ. अमेय बिडकर, हृदयरोग तज्ज्ञ.

रक्तदाबाची तपासणी कधी करावी?

  • चालताना भोवळ येत असल्यास
  • चालताना दम लागत असल्यास
  • कुटुंबात रक्तदाबाचे रुग्ण असल्यास
  • ताणतणावयुक्त जीवनशैली असल्यास
  • लठ्ठपणा व मधुमेहाचा त्रास असल्यास
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World high blood pressure day special 40 percent of patients suffer from high blood pressure mnb 82 mrj
Show comments