नागपूर: तुम्ही बाहेर असताना भूक लागल्यानंतर काय खायचे आणि कुठे खायचे हा प्रश्न पडतो. बाहेर मिळणारे खाद्य खरेच आरोग्यास चांगले आहे का, असा प्रश्नही मनात घोळत असतो. मात्र भविष्यात चिंता करायची गरज नाही, अशी कॅप्सूल तयार करण्यात येत आहे. शरीराला आवश्यक असणाऱ्या प्रोटिनसह महत्वाचे पोषणतत्व या कॅप्सूलमध्ये राहतील. वर्ल्ड पॅकेजिंग ऑर्गनायझेशनचे राजदूत डॉ चक्रवर्ती यांनी ही माहिती दिली.
७२ व्या फार्मसिटीकल काँग्रेसमध्ये सहभागी झाले असता त्यांनी ही माहिती दिली. वेळेत औषध घेणे फार महत्त्वाचे आहे. मात्र अनेक जण यात खंड पडतात. याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे वेळेत औषध घेणे आवश्यक आहे. बदलत्या जीवनपध्दतीनुसार ताणतणाव वाढला आहे. लहान मुलांमध्ये हे प्रकार बघायला मिळतात. वेळेत औषधी न घेतल्याने ताणतणाव वाढत आहे. यावरही संशोधन सुरू आहे. एकदा सकाळी औषध दिले तर दिवसभर गरज पडणार नाही. दिवसभराचे वर्तुळ पूर्ण करेल असेही डॉ. चक्रवर्ती यांनी सांगितले.