नागपूर : २० ते २२ जानेवारी दरम्यान ७२ व्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल ४१ वर्षांनंतर नागपुरात ‘इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस असोसिएशन’ आणि ‘फार्मास्युटिकल सायन्स’ विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर यांच्या संयुक्तवतीने होणार आहे. या परिषदेला जगभरातील औषधीशास्त्रातील शास्त्रज्ञ आणि विक्रेते येणार आहे.

विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवन इमारतीच्या परिसरात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २० जानेवारीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी ‘एसीजी कॅप्सूल लिमिटेड’चे अध्यक्ष डॉ. अजित सिंग, डॉ. वेणुगोपाल सोमाणी उपस्थित राहणार आहेत. ‘इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस’ ही देशभरातील फार्मा-व्यावसायिकांची एक संस्था असून देशाच्या कानाकोपऱ्यातील व्यावसायिक आरोग्य आणि विशेषतः फार्मसीशी संबंधित समस्यांवर चर्चा करण्यासाठी एकत्र येणार आहे.

Due to pending payments for four years 150 drug distributors stopped supplying medicines
मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील औषध पुरवठा ठप्प, लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय पुरवठा न करण्याचा वितरकांचा निर्णय
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
unregistered doctors , Maharashtra Medical Council,
नोंदणीकृत नसलेल्या डॉक्टरांवर नववर्षात कारवाई, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचा निर्णय
nashik md drugs loksatta
नाशिक : अमली पदार्थ विक्री प्रकरणी तीन महिलांसह चौघे ताब्यात
Mumbai municipal corporation latest news in marathi
मुंबई महानगरपालिकेकडून औषध वितरकांची १२० कोटींची देयके थकीत, देयके मंजूर न झाल्यास १३ जानेवारीपासून पुरवठा बंद करण्याचा इशारा
Nandurbar district fund for Sickle cell medicine
सिकलसेल औषध खरेदीचा निधी वर्षभरापासून पडून, नंदुरबार जिल्हा आरोग्य विभागाची उदासीनता
homeopathic doctors allows to prescribe allopathic medicines
सरकारला पॅथींचा वाद सोडवायचा आहे की नाहीच?
Republic Day 2025 Parade Ticket Booking Opens
Republic Day Parade : प्रजासत्ताक दिनाला परेड बघायला जायचंय? मग असे करा तुमचे तिकीट बुक; फक्त फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स

हेही वाचा >>> नागपूर : अनेक शिक्षक आमदारांना शिक्षकांऐवजी बिल्डरच्या प्रश्नात रस, मात्र नागो गाणार…; देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

देशाच्या विविध भागांतील शिक्षणतज्ज्ञ, शास्त्रज्ञ, उद्योगपती आणि तज्ज्ञांना एकत्र आणून ज्ञान आणि विचारांची देवाणघेवाण करणे, हा काँग्रेसचा उद्देश आहे. तसेच, ‘हेल्थ केअर सिस्टीम’मध्ये ‘फार्मासिस्ट’च्या भूमिकेचे सखोल विश्लेषण प्रदान करणे आणि शैक्षणिक/संशोधन क्षेत्रातील सहभागींचे ज्ञान अद्ययावत करणे, हा देखील या कॉँग्रेसच्या आयोजनामागचा हेतू आहे.

हेही वाचा >>> Maharashtra News Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोस दौऱ्यासाठी रवाना

७२ व्या ‘आयपीसी’ची संकल्पना ही ‘गुणवत्तापूर्ण आणि परवडणारी वैद्यकीय उत्पादने सहज प्राप्त करता येणे’ या विषयावर ही परिषद आहे. तीन दिवसांच्या ‘एक्स्पो’मध्ये ते त्यांची नवीनतम उत्पादने, तंत्रज्ञान आणि सेवा प्रदर्शित करतील. स्टॉल्समध्ये वैद्यकीय उपकरणे, फार्मा मशिनरी, प्रयोगशाळेतील उपकरणे, औषध उत्पादने, पुस्तके आणि ‘जर्नल्स’ इत्यादींचा समावेश आहे. विविध विषयांवर चर्चासत्र, परिसंवाद होणार आहे.

हेही वाचा >>> आर्थिक सल्लागार परिषदेवर विदर्भाला प्रतिनिधित्व द्या, डॉ. नितीन राऊत यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

परिषदेत १३ ‘सिम्पोजियम’ आणि पूर्ण सत्रांतर्गत ३९ व्याख्याने आयोजित करण्याची योजना आखली असून एकूण ८५ वक्ते आणि तज्ज्ञ तीन दिवसांच्या काँग्रेस दरम्यान विविध वैज्ञानिकांचे विविध सत्रांमध्ये व्याख्यान होणार आहे. उद्घाटन सत्रानंतर डॉ. अजित सिंग, अध्यक्ष, एसीजी कॅप्सूल लिमिटेड, डॉ. वेणुगोपाल सोमाणी, डीजीसीआय, केंद्र सरकार आणि अध्यक्ष आयपीसीए – २०२२ आणि डॉ. टीव्ही. नारायणा, सचिव, आयपीसीए आणि अध्यक्ष, आयपीए यांच्या उपस्थितीत ‘गुणवत्तापूर्ण आणि परवडणारी वैद्यकीय उत्पादने सहज प्राप्त करता येणे’ या विषयावर परिसंवाद होईल.

‘मेडिकल डिव्हाईस इंडस्ट्री: व्हिजन २०३०’, ‘फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजी आणि डीडीएसमधील प्रगती’, ‘डिजिटल थेरप्युटिक्स आणि रेग्युलेटरी अफेअर्स: डायनॅमिक्स, ड्रग डिस्कव्हरी: ब्रेकथ्रू’ आणि ‘इमर्जिंग ट्रेंडिंग’, ‘ट्रान्सफॉर्मिंग इन्फेक्ट्स’, ‘ट्रान्सफॉर्मिंग इन्फेक्ट्स’ या विषयांवर इतर परिसंवाद आयोजित केले आहेत. याशिवाय फार्मसी व्यवसाय: एफआयपी विकास उद्दिष्टे ‘सीपीए आणि एएआयपीएस’, ‘कर्करोग संशोधन: ट्यूमर टार्गेटिंग आणि उपचार’ याबाबत नामवंत व्यक्ती, फ्लोरिडा विद्यापीठ, दक्षिण कोरिया, ऑक्सफर्ड विद्यापीठ, यूके, यूएसए, यूएई, दक्षिण आफ्रिका येथील परदेशी वक्ते आणि आयपीसी, गाझियाबाद येथील तज्ञ; सीडीएससीओ, दिल्ली; आयसीटी सीएसआयआर आणि डीआरडीओ येथील तज्ञ मंडळी ऊहापोह करणार आहे. पत्रकार परिदेला अध्यक्ष अतुल मंडलेकर, डॉ. मिलिंद उमेकर, डॉ. प्रकाश इटनकर, डॉ. रवलीन खुराणा उपस्थित होते.

Story img Loader